निरवांगीच्या बंधाऱ्याचे ढापे गेले वाहून; 'नीरा'चा पाणीसाठा होतोय कमी

राजकुमार थोरात
Sunday, 8 November 2020

नीरा नदीचा पाणीसाठा कमी होत असल्याने तातडीने ढापे बसविण्याची मागणी.

वालचंदनगर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणी साठा झपाट्याने कमी होवू लागला आहे. पूराच्या पाण्याच्या बंधाऱ्याचे फायबर व लोखंडी ढापे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांपुढे ढाप्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने तातडीने ढापे बसवून बंधाऱ्याचे पाणी अडविण्याची मागणी शेतकऱ्यामधून होत आहे.

हेही वाचा -  तपासाबात नातेवाईकांची नाराजी; मृतदेह ताब्यात घेण्यास दिला नकार -

इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्हामध्ये चालू वर्षी मुसळधार पाउस झाला. नीरा नदीला १४ ऑक्टाेबर रोजी महापूर आला होता. २ लाख क्युसेक वेगाने नदीतून पाणी वाहत होते. पूराच्या पाण्यामुळे निरवांगीच्या बंधाऱ्याच्या शेजारी ठेवलेले  फायबर व लोखंडी ढापे पूराच्या पाण्यामध्ये  वाहून गेले आहेत. काही ढापे झाडाझुडपामध्ये अडकले आहेत.

पावसाळ्यामध्ये नीरा नदी दुथडी भरुन वाहत होती. गेल्या पंधरा दिवसापासून नदीच्या पात्रातील पाणी कमी होवू लागले आहे. शासनच्या नियमानूसार १५ ऑक्टोबर पासुन बंधाऱ्यावरील ढापे टाकून पाणी अडविण्यास सुरवात करण्यात येते. मात्र चालू वर्षी १५ ऑक्टोबर रोजी नीरा नदीला पूर आला होता. पूराचे पाणी ओसरुन पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. सध्या कुरवली,जांब व चिखलीच्या कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाटबंधारे विभागाने ढापे टाकण्यास सुरवात केल्यामुळे नदीतील वाहते पाणी बंद होणार असल्यामुळे निरवांगीच्या बंधाऱ्यावरती  तातडीने ढापे असून बंधाऱ्यामध्ये पाणी अडविण्याची गरज आहे.

हेही वाचा - आता काँग्रेसवर टीका करणारेच उद्या काँग्रेस पक्षात येतील -

ढापे टाकण्यास विलंब करु नये...यासंदर्भात निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ यांनी सांगितले की, दरवर्षी निरवांगी परीसरातील शेतकऱ्यांच्या नशिबी दुष्काळाच्या झळा असतात.चालू वर्षी चांगला पाउस झाला आहे. नीरा नदी दुथडी भरुन वाहत होती. सध्या नदीच्या पात्रातील पाणी कमी होवू लागले असून ढापे बसविण्यास विलंब झाल्यास बंधाऱ्यातील उन्हाळ्यामध्ये बंधाऱ्यामध्ये पाणी साठा कमी होईल अशी भिती निर्माण झाली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Nira river is declining for water due to the removal of the Nirvangi dam cover