esakal | नितीन गडकरींनी अंजीर-सीताफळ वाहतुक व विक्री साखळी मजबूतीची घेतली जबाबदारी
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

नितीन गडकरींनी अंजीर-सीताफळ वाहतुक व विक्री साखळी मजबूतीची घेतली जबाबदारी

sakal_logo
By
श्रीकृष्ण नेवसे

सासवड - पुरंदरच्या सीताफळाची मधुरता देशात कुठेच नाही, तर येथील अंजिराला तर भौगोलिक निर्देशांक (जी.आय.) मानांकन मिळाले आहे. देश व परदेशातूनही दोन्ही फळपिकांना वाढती मागणी आहे. मात्र सीताफळ, अंजिरात सुधारीत तंत्र, काढणी पश्चात तंत्र विकसीत होत असताना... नवे सुधारीत वाण वाढविणे गरजेचे आहे. तसेच या फळपिकांसाठी किमान देशभरात पुरवठा व विक्री साखळी लक्ष घालून अजून मजबूत करणे गरजेचे आहे., अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे समक्ष भेटीत करण्यात आली.

पुरंदर हायलँड फार्मर ग्रुप कंपनीमार्फत कंपनी अध्यक्ष तथा सिंगापूर (ता. पुरंदर) चे सुपूत्र रोहन सतीश उरसळ यांनी अंजीर संघाशी व सीताफळ संघाशी आणि अनेक उत्पादक शेतकऱयांशी संवाद करुन चर्चेतील मागण्यांबाबत यापूर्वी माजी केंद्रीय कृषी मंंत्री शरद पवार यांची भेट घेतली. आता नियोजित विमानतळ, पीएमआरडी, रिंगरोडमुळे रस्त्यांचे जाळे अंजीर - सीताफळाच्या आगाराकडे येत आहे. या पार्श्वभूमीवर फार्मर ग्रुप कंपनीचे प्रमुख नात्याने श्री.उरसळ यांना पुण्यात भेटीला बोलविले होते. त्यावेळी श्री. गडकरी यांना स्वतः श्री.पवार यांनीही पुरंदरच्या अंजीर - सीताफळाची खासियत कथन केली. भविष्यात येथील अंजीर - सीताफळ देशात विविध भागात आणि जगभरातही अजून अधिकपणे पोचेल, कारण चवीच्या बाबतीत त्याला तोड नाही., असेही श्री.पवार म्हणाले. तर श्री. उरसळ यांनी श्री.गडकरी यांच्यासमोर दोन्ही फळपिकांची पुरवठा व विक्री साखळी मजबूत करणे आणि सुधारीत वाण आणण्याकडे लक्ष वेधले. भेटीच्या वेळी संसद सदस्य गिरीश बापट, सुनील तटकरे, महापौर मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे आदीही उपस्थित होते. यावेळी सीताफळेही भेट दिली.

हेही वाचा: लिहिता न येणाऱ्या बायकांनी उभी केली २०० कोटींची बँक

भेटीची माहिती देताना श्री.उरसळ म्हणाले., नजीकच्या काळात चांगल्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने सिताफळ व अंजिराच्या आधुनिक संशोधित व नवीन प्रजाती विकसित करण्यासाठी आणि प्रसंगी प्रजाती बाहेरुनही आणण्याकरीता कंपनी कार्यरत असल्याची माहिती श्री.गडकरी यांना दिली. पुरंदरच्या भूमीत घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व अंजीर या दोन्ही वानांचे वेगळेपण व महत्त्व गडकरी यांनी समजून घेतले. येणाऱ्या काळात वाहतूक व दळणवळणाच्या माध्यमातून संपूर्ण देशात सदर सिताफळ व अंजीर या दोन्ही फळांच्या मागणीचा पुरवठा सुधारीत साखळीच्या माध्यमातून आपल्याला कशाप्रकारे करता येईल, यावर नियोजन करु. त्यासाठी जरूर ते सहकार्य करू,असे आश्वासन श्री.गडकरी यांनी दिले.

`शरद पवार मुख्यमंत्री असताना रोहयोतून फळबाग लागवड योजना आणली. तर नंतरच्या काळात दोन उपसा जल सिंचन योजनेत पुरंदरचा फळबाग पट्टा समाविष्ट केला. त्यामुळे दुष्काळग्रस्त असलेल्या पुरंदर तालुक्यात अंजीर व सिताफळाच्या मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड वाढली. आज येथील अंजीर क्षेत्र 1,750 एकरवर व सीताफळ 10,000 एकरवर असून ती संपूर्ण भारतभर नावारुपाला आलेली आहेत.आजच्या घडीला पुरंदरमधील लागवडीखालील फळपिक क्षेत्रापैकी 60 टक्के क्षेत्र हे अंजीर व सिताफळ फळ बागायतीचे झाले असून त्याचे सर्व श्रेय श्री शरद पवार यांना शेतकरी देतात., असे श्री. गडकरी यांना मी समक्ष सांगितले.``

- रोहन उरसळ

loading image
go to top