Monsoon
sakal
- मयूरेश प्रभुणे
पुणे - देशातील १६ हवामानशास्त्रीय उपविभाग आणि महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसह एकूण ४० टक्के क्षेत्रावर एक जून ते पाच ऑगस्ट या कालावधीत अपुरा पाऊस नोंदला गेला आहे. राज्यात या कालावधीत पावसाची सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त; तर देशात सरासरीपेक्षा ११.५ टक्के कमी नोंद झाली आहे. जुलै महिन्यात देशात सरासरीच्या तुलनेत एक टक्का जास्त, तर राज्यात ४० टक्के जास्त पाऊस नोंदला गेला. जुलैच्या पावसामुळे राज्यावर आतापर्यंत ‘एल निनो’चा प्रतिकूल प्रभाव पडला नसल्याचे चित्र आहे.