esakal | मोठी बातमी : पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही तक्रार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Pooja_Chavan

या प्रकरणाशी राज्य सरकारमधील एका राज्यमंत्र्याचे नाव जोडले जात आहे.​तशा आशयाचे अनेक मेसेज, ऑडिओ क्लिप समाजमाध्यमातून प्रसारित झाले आहेत.

मोठी बातमी : पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही तक्रार नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : वानवडी येथील तरूणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये तिच्या कुटुंबाकडुन अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तसेच याबाबत अन्य कोणीही कोणत्याही प्रकारे तक्रार केली नसल्याचे परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी स्पष्ट केले.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मावळ्यांसाठी आनंदाची बातमी; गडावर सापडली शिवकालीन वास्तू

बीडमधील परळी येथील पूजा लहू चव्हाण (वय २२, रा. हेवन पार्क, महंमदवाडी) या तरुणीने रविवारी मध्यरात्री इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना हडपसरजवळील महंमदवाडी परिसरात घडली होती. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पूजा इंग्रजी संभाषण कौशल्य अभ्यासक्रमासाठी शहरात आली होती. पूजा, तिचा चुलत भाऊ आणि एक मित्र हेवन पार्क परिसरातील सदनिकेत राहत होते. दरम्यान, पूजाच्या आत्महत्येमागचे कारण अद्यााप समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले.

German Bakery Blast: 'मी आईवर रागावले, पण आईने तिथून जाण्यास सांगितलं नसतं तर...!'​

दरम्यान याबाबत पोलिस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या, ‘पूजा ३० जानेवारीला पुण्यात आली होती. याप्रकरणात तिचा चुलतभाऊ आणि मित्राचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. या प्रकरणात अद्यााप तिच्या कुटुंबीयांकडून किंवा अन्य कोणाकडून कोणतीही तक्रार नोंदविण्यात आली नाही."

काय म्हणावं चोरट्यांना; लोणी-काळभोरमधून डोळे चेक करायच्या मशिन पळवल्या​

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापले 
या प्रकरणाशी राज्य सरकारमधील एका राज्यमंत्र्याचे नाव जोडले जात आहे. तशा आशयाचे अनेक मेसेज, ऑडिओ क्लिप समाजमाध्यमातून प्रसारित झाले आहेत. तसेच विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधीत प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी पत्रकार परिषदेत केली होती. तसेच या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापले असून एकमेकांवर आरोपांच्या फैरी उडविल्या जात आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top