पीएमपीकडे नव्या बस आता पुढच्याच वर्षी?संचालक मंडळ घेणार 'हा' निर्णय

मंगेश कोळपकर
बुधवार, 27 मे 2020

पीएमपीची वाहतूक 18 मार्चपासून टप्याटप्याने बंद होत गेली आहे. 25 मार्चपासून तर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठीच वाहतूक सुरू आहे. पीएमपीचे एरवीचे सुमारे दीड कोटी रुपये रोजचे उत्पन्न होते. सध्या फक्त 1 लाख रुपये रोज उत्पन्न येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 26 मे पासून पीएमपीची बस वाहतूक सुरू झाली आहे. त्यातून पहिल्या दिवशी सुमारे दीड लाख रुपये उत्पन्न आले आहे.

पुणे : कोरोनामुळे लागू झालेला लॉकडाउन, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांची बिकट झालेली आर्थिक परिस्थिती आणि उत्पादक कंपन्यांकडील टाळेबंदी, यामुळे पीएमपीच्या ताफ्यात आता यंदाच्या वर्षी एकही नवी बस दाखल होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

पीएमपीची वाहतूक 18 मार्चपासून टप्याटप्याने बंद होत गेली आहे. 25 मार्चपासून तर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठीच वाहतूक सुरू आहे. पीएमपीचे एरवीचे सुमारे दीड कोटी रुपये रोजचे उत्पन्न होते. सध्या फक्त 1 लाख रुपये रोज उत्पन्न येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 26 मे पासून पीएमपीची बस वाहतूक सुरू झाली आहे. त्यातून पहिल्या दिवशी सुमारे दीड लाख रुपये उत्पन्न आले आहे.  त्यासाठी सुमारे 100 बस 30 मार्गांवर सोडण्यात आल्या आहेत. परंतु तेथेही उत्पन्नापेक्षा खर्च अधिक, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या बसबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संचालक मंडळाला प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याचे पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

दिलीप बंड म्हणतात, विद्यापीठ रस्त्यावरील तीनही पूल पाडणे योग्यच

पीएमपीपुढे कडवे आव्हान
पीएमपीच्या 12 मीटर लांबीच्या बसमध्ये कमाल 21 प्रवासी तर, 9 मीटर लांबीच्या बसमध्ये 14 प्रवासी घेण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. या प्रवासी संख्येनुसार वाहतूक करायची झाल्यास बसची संख्या आणि फेऱयांची संख्या जास्त लागणार आहे. त्यामुळे संचलनातील तोटा वाढू शकतो. परिणामी प्रवासी संख्येवर
पीएमपीचे उत्त्पन्न अवलंबून आहे. यातून तोटा कमी करण्याचे आव्हान पीएमपीपुढे ठाकले आहे.

पुणे महापालिकेतील पदाधिकारी महिलेचा कोरोना रिपोर्ट समोर; रिपोर्टमध्ये...

नेमके काय झाले आहे
पीएमपीच्या ताफ्यात भाडेत्त्वरील बस आणि मालकीच्या बस येत आहेत. काही बस आल्या आहेत. आता भाडेत्त्वावरील बस येणार आहेत. परंतु, त्या बससाठी संचलनातील तूट दोन्ही महापालिकांनी द्यायची आहे. परंतु, दोन्ही महापालिकांची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे बस ताफ्यात समाविष्ट करण्याची प्रक्रिया अडचणीत आली आहे. दोन्ही महापालिकांनी अर्थसंकल्पात तरतूद केली असली तरी, ती रक्कम पीएमपीला मिळाली पाहिजे, तरच दोन्ही शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होऊ शकते.

भोरच्या रस्त्यांवर मुंबईच्या गाड्यांची गर्दी    

पीएमपीच्या ताफ्यात सरत्या वर्षात दाखल झालेल्या बस
- 400 बस  पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे - सीएनजीवरील - 12 मीटर रुंद
- 125 - ई - बस - भाडेतत्त्वावरील - 12 मीटर लांबीच्या - वातानुकूल (एसी)
- 484- भाडेतत्तावरील - सीएनजी - 12 मीटर लांबीच्या (5 ठेकेदार)

शिक्रापूर डेंजर झोनमध्ये, दोघांना कोरोनाची लागण  

येणाऱ्या बस - 350 ई बस - प्रक्रिया पूर्ण - 12 मीटर लांबीच्या

पीएमपीच्या ताफ्यातील सध्याच्या बस - एकूण 2600 - (पीएमपीच्या 1600, 900 भाडेतत्त्वावरील)

खेड तालुक्यात दोघांच्या मृत्यूने वाढली चिंता 

''कोरोनामुळे दोन्ही महापालिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात बस खरेदी किंवा भाडेतत्त्वावरील बस सामावून घेणे अवघड आहे. त्यामुळे या बाबत धोरणात्मक निर्णय दोन्ही महापालिकांनी घ्यायला हवा. त्यासाठी संचालक मंडळापुढे या बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्यातून अंतिम निर्णय घेण्यात येईल.''
- अजय चारठणकर (सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी)

रेल्वेच्या जागेवरील झोपडीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य रेल्वेने 'एसआरए' दिल्या 'या' सुचना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No new buses will be added to the PMP fleet this year