पुणे - ‘मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो, जबाबदारीने वार्तांकन करावे. एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झालेला नाही. एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही. सर्वांना परत पाठविण्याची व्यवस्था केली असून, जास्तीत जास्त उद्या सायंकाळपर्यंत त्या सर्वांना परत पाठविले जाईल,’ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केला.