पुण्यात आता ऑक्‍सिजनसाठी ‘नो वेटिंग’

Oxygen
Oxygen
Updated on

पुणे - रुग्णालयांमधील ऑक्‍सिजन तुटवड्याच्या संकटातून पुणे आता सावरत आहे. पुण्यात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या असलेल्या सप्टेंबरच्या तुलनेत सध्या ऑक्‍सिजनची ३५ टक्के मागणी घटली आहे. त्यामुळे आता ऑक्‍सिजनसाठी आता वेटिंगची गरज पडत नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यातील कोरोनाचे पहिले दोन रुग्ण पुण्यात ९ मार्चला आढळले. १६ सप्टेंबरला सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात ८२ हजार १७२ होते, अशी माहिती राज्याच्या आरोग्य खात्यात नोंदली आहे. त्यातील काही रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत होते. मात्र, त्यांना बेड अन दाखल केलेल्यांना ऑक्‍सिजन मिळत नव्हता. अशी अभूतपूर्व परिस्थिती पुणेकरांनी अनुभवली. 

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही याची गांभीर्याने दखल घेत ऑक्‍सिजन मागणीप्रमाणे पुरवठ्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. ऑक्‍सिजन उत्पादकांनी ८० टक्के पुरवठा वैद्यकीय उपचारांसाठी तर, उर्वरित २० टक्के औद्योगिक उत्पादनासाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या होत्या.

याबद्दल अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. जोशी म्हणाले, पुणे जिल्ह्यात १९ सप्टेंबरला १६९.७४ मेट्रिक ऑक्‍सिजनची मागणी होती. हीच मागणी ३ नोव्हेंबरला १०९.२७ मेट्रिक टनापर्यंत कमी झाली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील ऑक्‍सिजनची मागणी ३५ टक्‍क्‍यांनी कमी झाली. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये २४ ते ५८ टक्‍क्‍यांपर्यंत मागणी कमी झाल्याचे दिसत आहे. १९ सप्टेंबरच्या तुलनेत ३ नोव्हेंबरला पुणे विभागात ४० टक्‍क्‍यांनी ऑक्‍सिजनची मागणी कमी झाली आहे.’’

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद राजहंस म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून ऑक्‍सिजन लागणाऱ्या आणि व्हेंटिलेटर असणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे रुग्णालयातील ऑक्‍सिजनची गरज कमी झाली आहे.

ऑक्‍सिजन वितरण

  • ऑक्‍सिजन उत्पादकांची संख्या : ३ (पुणे २ आणि कोल्हापूर १)
  • रिफिलिंग केंद्रांची संख्या : ३० (पुणे १७, सातारा ४, सांगली २, सोलापूर ३, कोल्हापूर ४)
  • उत्पादन क्षमता : २७३ मेट्रिक टन
  • रुग्णालयांना होणारे वितरण : १२० मेट्रिक टन
  • रिफिलर्सना होणारा पुरवठा : १२३ मेट्रिक टन
  • इतर विभागांना होणारे वितरण : ३० मेट्रिक टन

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com