कात्रज डेअरीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ उमेदवारी अर्ज दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

katraj
कात्रज डेअरीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ उमेदवारी अर्ज दाखल

कात्रज डेअरीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी मंदळवारी आणखी नऊ जणांनी मिळून दहा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या दोन दिवसात अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या १३ झाली आहे. या १३ जणांनी एकूण १५ उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे कात्रज डेअरीचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी सांगितले.

हेही वाचा: INS शिवाजीच्या 'MAAC'च्या ३२ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा संपन्न

मंगळवारी उमेदवारी दाखल केलेल्यांमध्ये नीता गोळे (महिला राखीव), भगवान पासलकर (वेल्हे तालुका मतदारसंघ), देवेंद्र खिलारी दोन अर्ज (जुन्नर तालुका मतदारसंघ), संध्या फापाळे, जाईबाई साकोरे (दोन्ही महिला राखीव), बाळासाहेब साकोरे, संदीप ढोकले, संजय राका (तिघेही शिरूर तालुका मतदारसंघ) आणि ज्ञानेश्‍वार कुऱ्हाडे (जुन्नर तालुका मतदारसंघ)आदींचा समावेश आहे.

कात्रज डेअरीच्या संचालक मंडळाच्या १६ जागांसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. इच्छुकांना येत्या शुक्रवारपर्यंत (ता.१८) सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या संचालक मंडळाच्या १६ जागांपैकी बारामती व इंदापूर या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य ११ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक तालुका मतदारसंघ आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याला संचालक मंडळाची प्रत्येकी एक, याप्रमाणे ११ जागा आहेत. दोन जागा महिलांसाठी राखीव असून उर्वरित तीन जागांमध्ये अनुसूचित जाती व जमाती (एस.सी. व एस. टी.), नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती (व्ही. जे. एन. टी.) प्रत्येकी एक जागा राखीव असल्याचे सोबले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ५२ व्या तुकडीचा दिक्षान्त सोहळा उत्साहात संपन्न

आतापर्यंत २०८ उमेदवारी अर्जांची विक्री

जिल्हा दूध संघाच्या (कात्रज डेअरी) पंचवार्षिक निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या ६८ जणांनी मिळून गेल्या दोन दिवसात २०८ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यापैकी पहिल्या दिवशी (सोमवारी) ३८ इच्छुकांनी १३५ उमेदवारी अर्ज घेतले होते. मंगळवारी (ता.१५) आणखी ३० जणांनी मिळून ७८ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यानुसार गेल्या दोन दिवसांत मिळून ६८ जणांनी २०८ उमेदवारी अर्ज घेतले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी सांगितले.

Web Title: Nominations Filed Katraj Dairy Five Year Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top