
पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या पिंपरी, चिंचवड, वाकड, हिंजवडी, निगडी, भोसरी, दिघी, सांगवी या ठाण्यांसह ग्रामीण हद्दीतील देहूरोड, तळेगाव दाभाडे, चाकण व आळंदी या ठाण्यांचा समावेश करून 15 ऑगस्ट 2018 ला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन करण्यात आले.
पिंपरी : लॉकडाउनमुळे सामान्य नागरिकांसह गुन्हेगारही घराबाहेर पडले नाहीत. यामुळे यावर्षी पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटले. लॉकडाउनमुळे गुन्हेही "लॉक' झालेले असले, तरी सध्या अनेक प्रकरणात गुन्हा दाखल करून न घेता केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली जात आहे. त्यामुळे दाखल गुन्ह्यांचा आकडा कमी झाला आहे. दाखल गुन्ह्यांचा आकडा कमी झाल्याची बाब दिलासादायक असली, तरी ठाण्यात येणाऱ्या तक्रारदाराला योग्य न्याय मिळावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या पिंपरी, चिंचवड, वाकड, हिंजवडी, निगडी, भोसरी, दिघी, सांगवी या ठाण्यांसह ग्रामीण हद्दीतील देहूरोड, तळेगाव दाभाडे, चाकण व आळंदी या ठाण्यांचा समावेश करून 15 ऑगस्ट 2018 ला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. यामुळे गुन्ह्यांच्या तपासाचा वेग वाढला. पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिस दफ्तरी गुन्हा दाखल करून घेतला जाऊ लागला. यामुळे ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. मागील वर्षी 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पंधरा पोलिस ठाण्यात तब्बल 12 हजार 536 गुन्हे दाखल होते. पंधरा पैकी तब्बल सहा पोलिस ठाण्यांनी दाखल गुन्ह्यांची हजारी ओलांडली होती.
मात्र, चालू वर्षात दाखल गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यावर्षी 1 जानेवारी 30 नोव्हेंबर या कालावधीत पंधरा पोलिस ठाण्यात 8 हजार 576 गुन्ह्यांची नोंद झाली असून, केवळ चाकण पोलिस ठाण्याने एक हजाराचा आकडा ओलांडला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दोन जणांचा मृत्यू; तर 172 नवीन रुग्ण
दाखल गुन्ह्यांचे घटलेले प्रमाण ही दिलासादायक बाब समजली जात आहे. मात्र, ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळणेही गरजेचे आहे. अनेक प्रकरणात तक्रारदाराचे व्यवस्थित ऐकून न घेता ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, त्याच्या दबावातून किंवा वशिलेबाजीजून केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली जात आहे. अनेकदा गंभीर प्रकरण असतानाही अदखलपात्र गुन्हा नोंद करून तक्रारदाराला बेदखल करण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. यामुळे देखील दाखल गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अशा प्रकरणात तक्रारदारावर मात्र अन्याय होत आहे.
विधान परिषद मतदानासाठी पिंपरी-चिंचवड शहरात पदवीधरांसाठी 43, शिक्षकांसाठी 9 मतदान केंद्र
गुन्हेगारांना कोरोनाची धास्ती
खून, दरोडा खुनाचा प्रयत्न, विनयभंग अशा गुन्ह्यांची रोज नोंद होत असलेल्या आयुक्तालयाच्या हद्दीत लॉकडाउनच्या कालावधीत गुन्ह्यांचे प्रमाण अचानक घटले. कोरोनाची सामान्य नागरिकांसह गुन्हेगारांनी घेतलेली धास्ती, तसेच संचारबंदीमुळे पावलोपावली उभे असलेले पोलिस यामुळे हा परिणाम झाला. पोलिसांनी शहरातील मुख्य चौकासह रस्त्यांवर नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी करीत चौकशी केली जात होती. अशा काळात गुन्हेगार बाहेर न पडल्याने गुन्ह्यांचा आलेखही उतरला.
1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर दाखल गुन्हे
ठाणे-2019-2020
पिंपरी-1153-691
चाकण-1441-1282
हिंजवडी-1201-680
निगडी-1012-451
वाकड-1099-842
देहूरोड-1235-821
भोसरी-974-627
भोसरी एमआयडीसी-736-525
सांगवी-810-448
तळेगाव दाभाडे-827-623
चिंचवड-408-303
आळंदी-340-312
चिखली-662-432
दिघी-483-409
तळेगाव एमआयडीसी-155-130
एकूण-12536-8576