शिक्षकांनो शाळेत या नाही तर...; पुण्यातील या शाळेतील शिक्षकांना धमकी...

wagholi t.jpg
wagholi t.jpg

वाघोली (पुणे) : वाडेबोल्हाई येथील सिद्धाचलंम चॅरिटेबल ट्रस्टच्या आनंद गुरुकुल शाळेत शिक्षकांना जबरदस्तीने शाळेत बोलाविण्यात आले. शाळेत आला नाही तर वेतन देणार नाही अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे सोमवारी सात ते आठ शिक्षिका शाळेत आल्या. याबाबत ग्रामपंचायतीने शाळेला नोटीस काढली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, "ट्रस्टची आनंद गुरुकुल ही शाळा 10 वी पर्यंत आहे. लॉकडाऊनमध्ये शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, सोमवारी या शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा सिंह यांनी शिक्षकांना शाळेत बोलविले. शाळेत आला नाही तर वेतन देणार नाही अशी धमकी देण्यात आली. वाघोली व परिसरात शिक्षक राहतात. मुख्याध्यापिकाही वाघोलीत राहतात. त्याही तेथून शाळेत आल्या. शाळेत आल्यानंतर शिक्षकांना कामे सांगण्यात आली. 

यानंतर या शिक्षिका कार्यालयात एक टेबलाभोवती सामाजिक अंतर न ठेवता बसल्या होत्या. मास्क ही लावला नव्हता. ही बाब कळाल्यानंतर ग्रामसेवक अनिल व सरपंच दीपक गावडे हे शाळेत पोचले. त्यांनी मुख्याध्यापिका सीमा सिंह यांच्याकडे चौकशी केली असता आम्हाला कामासाठी शिक्षण विभागाने परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. या शाळेत 14 शिक्षक असून त्यातील 12 महिला शिक्षक आहेत. 

 

काही रिपोर्टकार्ड शिक्षकाकडे असल्याने ते गोळा करायचे होते. त्याचे काम पूर्ण करायचे होते. तसेच 10 वी पेपर बाबतही काम होते. मी वेगवेगळ्या वेळा देऊन त्यांना बोलविले होते. त्यांना सामाजिक अंतर ठेवून व मास्क वापरून काम करण्यास सांगितले होते. मात्र त्या एकत्र बसल्या. त्यांनी ही चूक केली. वेतन देणार नाही अशी धमकी दिली नाही. 
-सीमा सिंह, मुख्याध्यापिका, आनंद गुरुकुल स्कूल. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कोणत्याही शाळेला अशा प्रकारे परवानगी देण्यात आलेली नाही. असा प्रकार करणे चुकीचे आहे.

-रामदास वालझाडे, गट शिक्षणअधिकारी,  हवेली  

 

शाळेत शिक्षकांना बोलविण्यात आले होते. त्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले होते. कोणी परवानगी दिली व कोणत्या कामासाठी दिली ही माहिती जाणून घेण्यासाठी शाळेला नोटीस काढली आहे. मात्र, शाळेत ती स्वीकारण्यासाठी कोणी नसल्याने अद्याप देण्यात आलेली नाही. 
-अनिल बगाटे, ग्रामसेवक, वाडेबोल्हाई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com