कौतुकास्पद! रस्त्यावर भीक मागणारे आता करणार रक्तदान

now beggars will donate blood in pune
now beggars will donate blood in pune

पुणे : रस्त्यावर भिक्षा मागणारे धडधाकट नागरिक आता चक्क रक्तदान करणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रक्ताचा पडलेला तुटवडा लक्षात घेता त्यांनीही आता पुढाकार घेतला आहे. "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे' या विंदांच्या कवितेची प्रचिती या घटनेतून आली आहे. 

डॉ. मनिषा आणि डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या सोहम ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. "डॉक्‍टर फॉर बेगर्स' उपक्रमांतर्गत नाइलाजाने भिक्षा मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांना हे दांपत्य  मागील पाच वर्षांपासून मोफत वैद्यकीय सेवा देत आहे. आजपर्यंत अकराशे भिक्षेकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यातील 350 भिक्षेकऱ्यांची रक्तदानासाठी निवड करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. अभिजीत म्हणतात,"कोरोनामुळे रक्ताची उपलब्धी कमी झाली असून, नागरिक रक्तदानासाठी पुढे येत नाही. म्हणून माझ्या संपर्कातील धडधाकट भिक्षेकऱ्यांना रक्तदानाचे आवाहन केले. मागील तीन महिन्यांपासून आम्ही त्यांना समुपदेशन करत आहोत.'' पुढील चार महिन्यात टप्प्याटप्प्याने हे रक्तदान करण्यात येणार आहे. स्वारगेट येथील जनकल्याण रक्तपेढीत हे रक्तदान करण्यात येणार आहे. यासाठी भिक्षेकऱ्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. 

या माध्यमातून अनेक रुग्णांचे प्राणही वाचणार असून, एक याचक या निमित्ताने दाता होत आहे. भिक्षेकऱ्यांकडून रक्तदान करवून घेवून त्यांना समाजाच्या ऋण फेडण्याची संधी देणारी कदाचित हा पहिला उपक्रम असावा. त्यांचा प्रतिसाद बघता आम्हाला आनंद होत आहे. 
- डॉ. मनिषा सोनवणे, अध्यक्षा, सोहम ट्रस्ट. 

आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास

अभिनव उपक्रमास आम्ही सर्वतोपरी साहाय्य देणार आहे. यामुळे रक्ताची मागणी आणि पुरवठा काही अंशी तरी नक्कीच भरुन येईल, असा मला विश्‍वास आहे. 
- संतोष अनगोळकर, जनसंपर्क अधिकारी, जनकल्याण रक्तपेढी

संकलन आकड्यांचे... 
संपर्कातील भिक्षेकरी : 1100 
किती ठिकाणचे भिक्षेकरी घेणार सहभाग : 47 
रक्तदानाची तयारी दाखवलेले भिक्षेकरी : 900 
रक्तदानास पात्र भिक्षेकरी : 350 


कुरकुंभमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; लागोपाठ स्फोटांनी परिसर हादरला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com