धक्कादायक : पुण्यात पोलिसांच्या वायरलेस विभागात पोहोचला कोरोना

Now Corona enters in the wireless division of the pune police
Now Corona enters in the wireless division of the pune police

पुणे : राज्य पोलिस दलाच्या बिनतारी संदेश यंत्रणा (वायरलेस) विभागातील 23 जणाना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. वेगवेगळ्या कारणामुळे संबंधीत विभागमध्ये कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पाषाण येथे वायरलेस विभागाचे मुख्यलय आहे. या विभागात 150 हुन अधिक  अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. शहर पोलिस दलात कोरोनाने शंभरी ओलांडली असताना वायरलेस विभागात मात्र आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र मागील काही दिवसात अचानक वायरलेस विभागामध्ये कोरोना रुग्ण कोरोनाबाधीत आढळले. 29 जून रोजी 12 जण कोरोनाबाधित आढळले, त्यानंतर आणखी काही जणाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आणखी 11 जण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. तर वायरलेस वसाहतीमध्येही एक व्यक्ति कोरोनाबाधित आढळली आहे. अशा एकुण 23 जणाना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. 23 जणापैकी दोन जण पोलिस उपनिरीक्षक असून त्यांना सिंबायोसिस येथे तर अन्य कर्मचाऱ्यावर बालेवाडी येथे उपचार सुरु आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार...

दरम्यान, संबंधीत कार्यालयात विविध प्रकारच्या कामासाठी दररोज मोठ्या संख्येने मनुष्यबळ एकत्र येऊन काम करते. मात्र तेथे सामाजिक अंतर व मोजके मनुष्यबळ न ठेवणे वातानुकुलीत यंत्रणा बंद ठेवणे अशा कुठल्याच उपाययोजनाचे पालन केले जात नसल्याने रुग्ण संख्या वाढल्याचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यानी सांगितले.

'पुणेरी पाटी'ने सुरु केलं ऑनलाइन युद्ध, विषय हैदराबादी बिर्याणीचा 

"आम्ही मागील तीन महिन्यापासून पुरेपुर काळजी घेतली. मात्र लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर येथील कर्मचाऱ्याचा बाहेरील कोरोनाबाधीत व्यक्तिशी संपर्क आल्याने आमच्या कर्मचाऱ्याना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याना मास्क, सैनीटायझर दिले आहे. तसेच कार्यालयात औषध फवारणी करुन ते बंद ठेवले आहे."
- चंद्रकांत ढाकणे, पोलिस उपअधिक्षक, बिनतारी संदेश यंत्रणा, मुख्यालय, पाषाण. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com