Pune News : पुणेकरांना मिळणार दिलासा! आता पुण्याच्या रस्त्यांवर धावणार 'डबल डेकर' बस

Bus
Bus

पुणे - पुण्यात पुढील वर्षी पासून "डबल डेकर" बस धावण्याची शक्यता आहे. पीएमपीएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) च्या ताफ्यात पुढील वर्षी "डबल डेकर बस" दाखल होण्याची शक्यता आहे. (Pune News in Marathi)

Bus
Rahul Gandhi : भारत जोडोमध्ये सुरक्षेत हयगय? केंद्र सरकार म्हणतं, राहुल गांधींनीच...

पीएमपीएलची नुकतीच एक बैठक पार पडली आणि त्यात पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी याबद्दल माहिती दिली आहे. बकोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, "डबल डेकर बस पुण्यात सुरू करण्याबाबत प्राथमिक चर्चा झालेली आहे. मुंबईमध्ये डबल डेकर बस धावत आहेत याचे कारण म्हणजे तिथल्या पायाभूत सुविधा (infrastructure) पुण्यापेक्षा वेगळ्या आहेत."

हेही वाचा क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Bus
Video : पुण्यात 'मुळशी पॅटर्न' कायम? कोयत्याचा धाक दाखवत टोळक्याची दहशत

दरम्यान आम्ही मुंबईमधील बेस्टशी यासंदर्भात चर्चा करणार आहोत. या बसेस पुण्यासह, पिंपरी चिंचवडमध्ये किती यशस्वी होतील यासाठी एक अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर याबद्दल ठोस निर्णय घेतला जाईल, असे बकोरिया पुढे म्हणाले. त्यामुळे मुंबईप्रमाणे पुण्यात देखील "डबल डेकर बस धावताना दिसू शकतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com