वीजग्राहकांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, कारण आता...

मिलिंद संगई 
Sunday, 30 August 2020

-वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्यासाठी आता पाच दिवसांची मुदत
-पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांची माहिती

बारामती : प्रत्येक महिन्याच्या निश्चित तारखेला महावितरणकडून वीजग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेण्यात येत आहे. मात्र ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्यासाठी पूर्वी 24 तासांची असलेली मुदत आता पाच दिवसांच्या कालावधीपर्यंत वाढविण्यात आली आहे. 

Rainfall : गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद!

तसेच स्वतःहून रिडींग पाठविल्यास विविध फायद्यांसह बिलाची पडताळणी देखील वीजग्राहकांना शक्य होत आहे. ग्राहकांनी पाठविलेले रिडींग स्वीकारण्यात येत असल्याने महावितरण मोबाईल अँप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठविण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.

महावितरणकडून केंद्रीकृत वीजबिल प्रणाली (सेंट्रलाईज बिलिंग सिस्टीम) सुरु करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 25 तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रिडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांक देखील नमूद आहे. रिडींगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून पाच दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठविता येईल. पूर्वी केवळ मीटर रिडींग न होऊ शकल्याने ग्राहकांना मेसेज पाठविले जात होते व रिडींगसाठी 24 तासांची मुदत देण्यात येत होती. मात्र आता दरमहा रिडींग पाठविण्यासाठी तब्बल पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ग्राहकांनी मीटरचे केडब्लूएच (kWh) रिडींग व त्यानुसार रिडींगचा फोटो पाठविल्यास महावितरणकडून घेण्यात आलेल्या रिडींगऐवजी ग्राहकांनी पाठविलेल्या रिडींगनुसार बिल तयार केले जात आहे.

विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा​

मीटर रिडींग पाठविण्यासाठी सर्वप्रथम महावितरण मोबाईल अॅप डाऊनलोड करणे व महावितरणकडे मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी असणे आवश्यक आहे. महावितरण मोबाईल अॅपमध्ये ‘सबमीट मीटर रिडींग’वर क्लिक केल्यास एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रिडींग पाठवायचे आहे तो क्रमांक सिलेक्ट करावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा. मीटर रिडींग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रिडींगची संख्या व केडब्लूएच (kWh) असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा. त्यानंतर फोटोनुसार मन्यूअली रिडींग अॅपमध्ये नमूद करावे व सबमीट करावे. मोबाईल अॅपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रिडींग थेट सबमीट करता येईल. मात्र गेस्ट म्हणून मीटर रिडींग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल. ज्या ग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईटवरून फोटो व मीटर रिडींग अपलोड करायचे आहे त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करणे आवश्यक आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणाऱ्या या प्रक्रियेतून लघुदाब वीजग्राहकांनी दरमहा मीटर रिडींग व फोटो महावितरणकडे स्वतःहून पाठविल्यास अनेक फायदे होणार आहे. स्वतःच्या मीटरकडे व रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल.

(Edited by : Sagar Diliprao Shelar) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now five days to send meter readings to power consumers themselves