आता 'जलदूत' देणार पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश

Prakash-Javadekar
Prakash-Javadekar

पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल, असा विश्‍वास केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. 

माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित 'जलदूत' प्रदर्शनाला जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखविला. महापौर मुक्‍ता टिळक, खासदार गिरीश बापट व सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे महासंचालक सत्येंद्र शरण, संचालक आर. एन. मिश्रा, डी. जे. नरेन, संतोष अजमेरा आदी या वेळी उपस्थित होते. 

जावडेकर म्हणाले, 'केंद्र सरकारने राबविलेल्या ठळक निर्णायक योजनांवर शंभर दिवसांत या प्रदर्शनातून प्रकाश टाकण्यात आला आहे. मोदी सरकारने जलसंधारणाला प्राधान्य दिले आहे. देशात पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी 'जलशक्ती'चे नवीन मंत्रालय स्थापन केले आहे. प्रत्येक घरात 2024 पर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.' या वेळी जावडेकर यांच्यासह उपस्थितांनी जलसंवर्धन, स्वच्छतेचे पालन करण्याची आणि प्लॅस्टिकचा वापर न करण्याची शपथ घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com