Corona Updates: पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या पोचली १० हजारांजवळ; सलग चौथ्या दिवशी वाढ!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 3 हजार 903 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय 6 हजार 32 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.21) सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांत वाढ झाली असून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी 914 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दहा दिवसांच्या खंडानंतर पुन्हा एकदा दहा हजारांच्याजवळ पोचली आहे. दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 443 जण आहेत.

सात महिन्यानंतर सुरू होणार शाळा; नववी ते बारावीचे वर्ग भरणार!​

शनिवारी दिवसभरात 10 हजार 902 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 760 जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी चार रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी नगरपालिका आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

खासगी-सरकारी भेदभाव न करता कोरोना चाचणी करा; शिक्षण संस्थाचालकांच्या विविध मागण्या​

पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 3 हजार 903 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय 6 हजार 32 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 35 हजार 425 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 17 हजार 388 कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 8 हजार 266 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 387 रुग्ण आहेत.

शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये 192, जिल्हा परिषद क्षेत्रात197, नगरपालिका
क्षेत्रात 66 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 16 नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही शुक्रवारी (ता.20) रात्री आठ वाजल्यापासून शनिवारी (ता.21) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of active corona patients in Pune district has reached close to ten thousand