वाघोलीत कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात; पण...

निलेश कांकरिया
सोमवार, 29 जून 2020

वाघोलीत दोन दिवसांत तीन रुग्णांची भर पडली असली, तरी दोन रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले आहेत.

वाघोली (पुणे) : वाघोलीत दोन दिवसांत तीन रुग्णांची भर पडली असली, तरी दोन रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले आहेत. 26 पैकी 20 रुग्ण बरे झाले असून, सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरालगत असूनही वाघोलीत चांगले नियंत्रण आहे. भविष्यातही अशीच काळजी घेण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दोन दिवसांत अनुक्रमे 65, 41 आणि 8 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाले. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. हे तिन्ही रुग्ण वाघोली-केसनंद रस्त्यावरील आहेत. मात्र वेगवेगळ्या सोसायट्यांमधील आहेत. सध्या येथे संशयितांचे स्वॅब घेण्याची सुविधा असून, कोविड केअर सेंटरदेखील वाघोलीत उपलब्ध आहेत. वाघोलीची लोकसंख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहेत. बहुतांश नागरिक नोकरी अथवा कामाच्या निमित्ताने शहरात पुरेशी काळजी घेऊन जातात. 

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

वाघोलीत 15 एप्रिलला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतरच्या 60 दिवसांत आणखी 25 रुग्णांची भर पडली. मात्र त्यातील 20 ठणठणीत बरे झाले असून, केवळ सहा रुग्ण ऍक्‍टिव्ह आहेत. त्यामुळे या परिसरात कोरोना परिस्थितीवर उत्तम नियंत्रण आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आवश्‍यक काळजी घेत आहेत. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाते. 51 जणांवर कारवाई करण्यात आली. पुणे-सोलापूर रस्त्यावरील व हवेली तालुक्‍यातील गावात रुग्णांचे प्रमाण अधिक वाढले आहे.

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

मात्र वाघोली व परिसरात परिस्थिती नियंत्रणात आहे. व्यापारीही प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. मास्कचा वापर न करणे ही काही जणांची बेफिकिरी होत आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर व गर्दी टाळणे या बाबी वाघोलीकर कटाक्षाने पळत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona infections in Wagholi is under control