बारामतीकरांनो, कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा आकडा पाहा आणि आतातरी काळजी घ्या! 

बारामतीकरांनो, कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा आकडा पाहा आणि आतातरी काळजी घ्या! 

बारामती : एकीकडे लॉकडाऊनचे बंधन घालूनही बारामतीचा कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होण्याचे नाव घेईना अशी स्थिती आहे. गेल्या 24 तासात बारामतीत 13 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला त्या पैकी 9 जण बारामतीतील आहेत. 

दरम्यान काल (ता. 13) बारामतीत 932 जणांची तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल 330 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. सोमवारी (ता. 12) केलेल्या तपासण्यांपैकी प्रलंबित असलेल्या 209 नमुन्यांपैकी 77 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्या मुळे 12 एप्रिलची आकडेवारीही 314 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. दोन दिवसात बारामतीत तब्बल 644 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले. तर गेल्या चोवीस तासात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 

बारामतीत रुग्णांच्या सोयीसाठी प्रशासन व सेवाभावी संस्था रात्रीचा दिवस करीत आहेत, कोणताही रुग्ण त्याला उपचार मिळाले नाही म्हणून अडचणीत येणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे, दुसरीकडे लॉकडाऊनही लोक पाळत आहेत, मात्र तरिही ही साखळी तुटता तुटत नाही, अशी स्थिती आहे. तपासण्यांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्या वाढत आहे, मात्र हा आकडा हळुहळू कमी येईल, असे तज्ज्ञांना वाटते. 

बारामतीच्या रुग्णसंख्येची वाटचाल वेगाने 13 हजारांच्या दिशेने सुरु आहे. आज 12540 रुग्णसंख्या झाली आहे. बरे झालेले रुग्ण 9835 इतके असून आता मृत्यूचा आकडाही 190 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. बारामतीच्या जळोची स्मशानभूमीमध्ये दररोज नियमितपणे अंत्यसंस्कार होत आहेत.  

बारामतीत तयारी पूर्ण....
आज रात्रीपासून सुरु होणा-या ब्रेक द चेनची तयारी बारामतीत करण्यात आली आहे. वाहतूकीवर व विनाकारण बाहेर फिरणा-यांवर पोलिस कारवाईच्या मनःस्थितीत असून शहरातील महत्वाच्या चौकात पोलिसांनी अडथळे उभे केले आहेत. 

बारामतीची आजची स्थिती.....
•    एकूण पॉझिटीव्ह रुग्ण संख्या- 12540
•    उपचाराखालील रुग्ण- 2350
•    लक्षणरहित रुग्ण- 1007
•     सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- 662
•    मध्यम लक्षणे असलेले रुग्ण- 535
•    ऑक्सिजनवरील रुग्ण- 123
•    व्हेंटीलेटरवरील रुग्ण- 23
•    बरे झालेले रुग्ण 9835
•    मंगळवार (ता. 13) पर्यंत घेतलेले स्वॅब- 62673
•    पॉझिटीव्ह 12540 व निगेटीव्ह- 50223
•    उपचाराखालील रुग्ण- वैद्यकीय महाविद्यालय- 723,
रुई- 30, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 157, बारामती हॉस्पिटल- 64, इतर सर्व हॉस्पिटल- 848, गृहविलगीकरणातील रुग्ण- 573, पुण्यात उपचार घेणारे- 16
•    कोविड केअर सेंटरची आकडेवारी- वैद्यकीय महाविद्यालय- 218. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह- 86, तारांगण मुलींचे वसतिगृह- 102, माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज वसतिगृह- 233, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह- 84.
•    बारामती शहर व तालुक्यात आजअखेरपर्यंत झालेले लसीकरण- 62305.

(संपादन : सागर डी. शेलार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com