esakal | बारामतीतील लॉकडाउनचे असे आलेत रिझल्ट...नागरिकांकडून मोठी मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

कोरोनाचे सावट बारामतीवरून हळूहळू कमी होताना दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसात बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आजुबाजूच्या तालुक्यांच्या मानाने वेगाने घटत असल्याने

बारामतीतील लॉकडाउनचे असे आलेत रिझल्ट...नागरिकांकडून मोठी मागणी 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाचे सावट बारामतीवरून हळूहळू कमी होताना दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसात बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आजुबाजूच्या तालुक्यांच्या मानाने वेगाने घटत असल्याने नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी ठरत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यात बारामतीच्या प्रशासनाला यश मिळाले आहे, असे यातून दिसून येत आहे. 

वीजग्राहकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता

बारामतीत काल घेतलेल्या 65 पैकी 63 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून, तालुक्यातील सांगवी येथील एक 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, एक अहवाल प्रतिक्षेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. बारामतीत गेल्या आठ दिवसात 459 रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी फक्त 27 जण पॉझिटीव्ह निघाले आहेत, ही बाब बारामतीकरांसाठी दिलासादायक आहे. कोरोनामुक्त असलेल्या बारामतीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर मध्यंतरी पुन्हा सात दिवसांचा लॉकडाउन पाळला गेला. या लॉकडाउननंतर रुग्णांची संख्या आता घटू लागल्याचे चित्र आहे. 

पुण्यात शिवसेनेला बळ मिळणार

बारामती शहरातील मूळ नागरिकांना बाधा होण्याचे प्रमाण नगण्य आहे, बाहेरगावाहून प्रवास करून आलेल्यांमुळेच कोरोनाचा प्रसार वेगाने झाल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. बाहेरगावाहून आलेल्या लोकांनी व्यवस्थित काळजी न घेतल्याने संपर्कातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे नंतर दिसून आले. 

पुण्यात या ठिकाणी रुग्णांना मिळतोय दिलासा

दुकानांची वेळ वाढवण्याची मागणी 
बारामतीतील रुग्ण संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, जिमला परवानगी द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. दुकानांची वेळ संध्याकाळी सातपर्यंत करण्यास परवानगी द्यावी जेणेकरून काही तासात होणारी गर्दी विभागली जाईल, असे व्यापा-यांचे मत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासह इतरही काळजी घेतली जात आहे. त्यामुळे उलट जास्त वेळ दुकाने सुरु ठेवण्याचा कालावधी केल्यास गर्दी टाळता येणे शक्य होणार आहे.