esakal | पुण्यातून आलेल्यांमुळे इंदापूरमध्ये असा वाढला धोका  
sakal

बोलून बातमी शोधा

corona

पुण्यातून इंदापूर शहरातील वेगवेगळ्या भागात आलेल्या दोन महिला कोरोनाबाधित आढळल्या आहेत.

पुण्यातून आलेल्यांमुळे इंदापूरमध्ये असा वाढला धोका  

sakal_logo
By
डाॅ. संदेश शहा

इंदापूर (पुणे) : पुण्यातून इंदापूर शहरातील वेगवेगळ्या भागात आलेल्या दोन महिला कोरोनाबाधित आढळल्या आहेत.

पुण्यात आता पीएपी बससेवा सुरू होणार

त्यांच्या संपर्कातील एकूण सतरा जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे (स्वॅब) नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या नवीन दोन कोरोनाबाधित महिलांमुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या तेरावर पोहचली आहे, अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.

झेडपीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून शिक्षक करतात असं काही
  
मूळची पुण्याची असणारी व चार दिवसांपूर्वी इंदापूरमधील नातलगांकडे आलेली ४५ वर्षांची महिला व माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पेट्रोलपंपाच्या मागे रहात असणारी ४७ वर्षीय महिला कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी सांगितले की, मूळच्या पुण्यातील असणाऱ्या महिलेच्या मुलाची सासरवाडी इंदापूर आहे. ती चार दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत इंदापूरला आली होती. ती बारामती रस्त्याकडे असणा-या बाह्यवळण रस्त्यालगतच्या हाॅटेलजवळच्या घरी राहिली. तिच्या बरोबर असणारे तिचे अकरा नातेवाईक कसबा पेठेतील त्यांच्या नातलगांच्या घरी दोन दिवस राहिले होते. त्या महिलेचे स्वॅबचे नमुने तपासणीस पाठवल्यानंतर रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे तिला उपचारासाठी येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तिच्या समवेत आलेल्या अकरा जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
  

पुण्यात आरटीओचे कामकाज पूर्ववत होणार


तसेच, माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पेट्रोलपंपाच्या मागे रहात असणारी महिला आपल्या कुटुंबासमवेत विवाह सोहळ्यासाठी पुण्याला गेली होती. परतल्यानंतर तिला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. तेथे ती कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पुण्यातून आलेल्या व कसबा पेठेत राहिलेल्या एक जणाने त्याला विलगीकरण कक्षात ठेवताना डाॅक्टर व त्यांचे सहकारी व प्रतिष्ठित नागरिकांशी हुज्जत घातली. त्यामुळे काही काळ वातावरण संवेदनशील झाले होते.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंदापूर शहरात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढल्यामुळे अनामिक भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता शासन नियमांचे पालन करून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे. 
 - अंकिता शहा, नगराध्यक्षा, इंदापूर

loading image
go to top