पुण्यात दीड लाखाहून अधिक नागरिक अडकले कोरोनाच्या जाळ्यात!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

गेल्या २४ तासांत ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या एकूण मृत्यूपैकी पुणे शहरातील सर्वाधिक ३१ रुग्ण आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.२६) दिवसभरात ३ हजार २४४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पाचव्यांदा प्रतिदिन नव्या रुग्णांचा तीन हजारांचा आकडा क्रॉस झाला आहे. शिवाय आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येने दीड लाखांचा आकडा ओलांडला गेला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बुधवारी दिवसभरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ६१७ रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ७३९ रूग्ण वाढले आहेत. तर दिवसभरात ३ हजार २१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील १ हजार ३१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३६६, नगरपालिका क्षेत्रातील १५७ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील ७३ रुग्णांचा समावेश आहे.

वडिलोपार्जित मालमत्ता एकट्याला हवी आहे, तर...

दरम्यान, गेल्या २४ तासांत ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या एकूण मृत्यूपैकी पुणे शहरातील सर्वाधिक ३१ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १५, जिल्हा परिषद क्षेत्रातील ६, नगरपालिका आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी पाच रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही मंगळवारी (ता.२५) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता.२६) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

यामुळे जिल्ह्यातील बुधवार अखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ५३ हजार १४१, कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख १८ हजार ५९०, तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या ३ हजार ८०४ झाली आहे. मृत्यू  झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ९९ रुग्णांचा समावेश आहे.

'जम्बो सेंटर'नंतर आता पश्‍चिम पुण्यासाठी नवं कोरोना हॉस्पिटल; महापौरांनी दिली माहिती​

आतापर्यंत पावणे सात लाख चाचण्या 

दरम्यान, कोरोनाचे अचूक निदान करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील एकूण सहा लाख ६९ हजार ३५७ व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक पुणे शहरातील चार लाख २० हजार ४५७ व्यक्तींच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये १ लाख ६४ हजार ६३९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५१ हजार ४६२, नगरपालिका क्षेत्रात २१ हजार ९२ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ११ हजार ७०६ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of corona patients in Pune district crossed one and half lakh