बाप रे! पुणे विभागात कोरोना बळींचा आकडा शंभरी पार करणार

The number of Corona victims in Pune division will cross 100.jpg
The number of Corona victims in Pune division will cross 100.jpg

पुणे : पुणे विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 905 झाली असून, विभागात 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 77 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, 305 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.



पुणे जिल्ह्यात 1 हजार 738 कोरोना बाधित रुग्ण असून, 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 43 रुग्ण असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 81 रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 30 रुग्ण असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्ह्यात 13 बाधित रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात 268 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

पुणे विभागात एकूण 62 लाख 89 हजार 701 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 2 कोटी 42 लाख 11 हजार 256 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 414 व्यक्तींची अधिक तपासणी करण्यात येणार आहे. 

पुण्यात हॉटस्पॉट संदर्भात मोठा निर्णय; दहा ठिकाणची सर्व दुकाने होणार बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com