पुणे : हवेली तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 54 वर...

COVID Update
COVID Update

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यात गुरुवारी (ता. १०) दिवसभरात कोरोनाचे ५४ रुग्ण आढळून आले असून, तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या चारशेवर पोचली आहे. गुरुवारी दिवसभरात 27 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, वडकी व नांदेड ग्रामपंचायत हद्दीत दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली. 

सलग तिसऱ्या दिवसी पूर्व हवेलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णवाढीचा वेग कायम राहिला असून, हवेली तालुक्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण पूर्व हवेलीमधील मांजरी बुद्रुक, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन व शेवाळेवाडी या पाच ग्रामपंचायत हद्दीत आढळून आले. पाच ग्रामपंचायत हद्दीतील रुग्ण वाढीला आळा बसावा, या उद्देशाने प्रशासनाने बुधवारी (८) रात्रीपासून जाहीर केलेल्या कंटेन्मेट झोनचा उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती या प्रमुख 3 ग्रामपंचायत हद्दीत फज्जा उडाला. मुख्य बाजारपेठ बंद तर गल्लीबोळात जोरदार व्यवसाय चालू अशी परिस्थिती गुरुवारी दिवसभरात राहिली.

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन (५), मांजरी बुद्रुक (१६), लोणी काळभोर (१), कदमवाकवस्ती (३), नांदेड (५), खडकवासला (७), केसनंद (१), कोलवडी (१), खानापुर (२), गोरेखुर्द (१), औताडे-हांडेवाडी (२), शेवाळेवाडी (५) व देहु (३) या तेरा गावात ५४ रुग्ण आढळून आले आहेत. मांजरी बुद्रुक, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन व शेवाळेवाडी या पाच ग्रामपंचायत हद्दीत रुग्न वाढीचा वेग कायम आहे.

उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासनावर सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची पकड राहिली नसल्याने, कंटेन्मेट झोन जाहीर होऊनही छोटो-मोठे उद्योग चालू राहिल्याचे चित्र दिवसभर दिसून आले. कंटेन्मेट झोन जाहीर झाल्याने, दुकान बंद करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दमदाटी होण्याचा प्रकारही गुरुवारी उरुळी कांचन येथे घडला आहे.

कायदेशीर कारवाई वाढवणार : सुरज बंडगर

कंटेन्मेट झोनमधील कारवाईबाबत बोलताना लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, उरुळी कांचन, लोणी काळभोर, कुंजीरवाडी व कदमवाकवस्ती या चार ग्रामपंचायत हद्दीत प्रशासनाने बुधवारी रात्रीपासून कंटेन्मेट झोन जाहीर केला आहे. कंटेन्मेट झोन जाहीर झाल्याची माहिती अनेकांना नसल्याने, पोलिसांनी गुरुवारी दिवसभर प्रबोधन केले आहे. 

चारही ग्रामपंचायत हद्दीत दिवसभर मुख्य बाजारपेठा बंद असल्या तरी गल्लीबोळात व्यवसाय चालू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र, आजपासून मुख्य बाजारपेठासह गल्लीबोळातही कायदेशीर कारवाई कडक करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत पातळीवर दंड आकारणी बरोबरच, पोलिस कारवाईला सामोरी जावे लागणार असल्याने, व्यावसायिकांनी आपआपले व्यवहार बंद ठेवावेत असे आवाहन बंडगर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com