....म्हणून सिंहगडावर येणाऱ्यांची वाढतीये संख्या

singhgad.jpg
singhgad.jpg

खडकवासला (पुणे) : गड- किल्ल्यांच्या भटकंतीला परवानगी मिळाल्याने सध्या सिंहगडावर ट्रेकर्स अन् व्यायामाला येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शहरालगत असलेल्या सिंहगडावर ट्रेकिंग, चालणे, डोंगर चढण्याचा व्यायाम करण्यासाठी दर रविवारी वर्षभर अनेक जण येत असतात.

कोरोनामुळे मध्यंतरीच्या काळात सिंहगड बंद असल्याने ट्रेकर्सची थंडावली होती. कोणीही गडावर फिरकत नव्हते. सिंहगडावर पायी जाण्यासाठी आतकरवाडी मार्गे पुणे दरवाजापर्यंत पायवाट आहे. ही पायवाट अवघड काही ठिकाणी थेट चढण आहे. मागील रविवारपासून ट्रेकर्सची गर्दी वाढत आहे. मागील आठवड्यात गुरुवार, शुक्रवार, शनिवारी, रविवारी ही गर्दी वाढलेली आहे. सिंहगडावर पायी येण्यासाठी रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून अनेक जण येत असतात. मागील आठवड्यात शहर परिसरात थंडीला चांगली सुरुवात झाली. त्यामुळे, व्यायाम करणाऱ्या सगळीकडे गर्दी वाढली. जिल्हा प्रशासनाने गड-किल्ले ट्रेकिंगसाठी खुले केल्यामुळे सिंहगडावर चांगलीच गर्दी वाढत आहे. मागील रविवारी 8 नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजेपर्यंत सुमारे दोन हजार ट्रेकर्स व्यायामासाठी गडावर आले होते.

सकाळी नऊनंतर आलेल्या ट्रेकर्सला आतकरवाडीतून हवेली पोलिसांनी परत पाठवले. " या रविवारी 15 नोव्हेंबर रोजी सिंहगड पायथा येथे दुचाकी सुमारे 300 पेक्षा जास्त आणि चार चाकी वाहने अडीचशे पेक्षा जास्त आली होती. त्याचं 'पीएमपी'च्या बस पूर्ण भरून आल्या होत्या, असे असले तरी मागील आठवड्यापेक्षा या रविवारी दिवाळीमुळे गर्दी थोडी कमी होती." अशी माहिती गडावर नियमित येणारे मोहन ओगले यांनी सकाळ'शी बोलताना दिली.

"आम्ही शाळेतील शिवणे येथील 93चे दहावीमधील मित्र वर्षभरात दोन- तीन वेळा भेटतो. पण यंदा कोरोनामुळे जमले नव्हते. आमचे वर्गमित्र संतोष दांगट पाटील यांनी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळी व परिसराचे वर्षभर साफसफाईचे कार्य हाती घेतले आहे. यानिमित्त सिंहगडावर पायी जाऊन त्या लोकांना धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळी भेट दिली." असे गडवर नियमित येणारे नांदेडचे समीर जाधवराव यांनी सांगितले. "व्यायामासाठी आम्ही गेली अनेक वर्षे सिंहगडावर आठवड्यातून किमान एक-दोन वेळा जात असतो." असे गणेश गायकवाड, शहाजी मोहिते, दत्ता आलगुडे सुधीर धावडे व महेश मोकाशी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com