बदलत्या हवामानाच्या अंदाजासाठी 'एनडब्ल्यूपी' प्रणाली ठरतेय उपयुक्त; काय आहे एनडब्ल्यूपी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

- सीसीसीआर कार्यकारी संचालक डॉ. कृष्णन राघवन यांचे प्रतिपादन
- आयआयटीएम मार्फ़त 'हवामान विज्ञान' विषयावर आयोजित करण्यात आले व्याख्यान

पुणे : "मानवाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे हवामान बदलाला आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत असून बदलत्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी 'संख्यात्मक हवामान अंदाज' प्रणाली (एनडब्ल्यूपी) उपयुक्त ठरत आहे," असे प्रतिपादन सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्चचे (सीसीसीआर) कार्यकारी संचालक डॉ. कृष्णन राघवन यांनी केले.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) वतीने 'हवामान विज्ञान व इएसएम प्रणालीचा विकास आणि संधी' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी डॉ. राघवन बोलत होते. 

पुणेकरांनो, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार 

डॉ. राघवन म्हणाले, "हरितगृह वायू आणि मानवी प्रक्रियांमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. याचा थेट परिणाम हवामानावर होत आहे. एनडब्ल्यूपीच्या आधारावर समुद्रात येणारे चक्रीवादळ, समुद्रातील तापमान, सुक्ष्मजीवांमुळे तयार होणारे क्लोरोफिल त्याचबरोबर वातावरणातील बदल यांसारख्या घटकांचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. या प्रणालीमध्ये मोठ्या संख्यांची गणना करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक संगणकांची आवश्यकता असते.

यासाठी 'आयआयटीएम'तर्फे तयार करण्यात आलेल्या 'प्रत्युष' या संगणकाचा वापर केला जात आहे. तसेच यामुळे मॉन्सून, एलनिनो, चक्रीवादळ, धुळीचे वादळ यासारख्या गोष्टींचे निरीक्षण करणे आणि त्यानुसार विविध कालावधीतील अंदाज वर्तवण्यास मदत मिळते. नुकतेच आलेल्या 'अम्फान' या चक्रीवादळाच्या प्रवासाचा अंदाज वर्तविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता."

पुणे विद्यापीठात गैरव्यवहार? आदेश झुगारत 'ते' पैसे वाटलेच कसे?

'आयआयटीएम'तर्फे 'अर्थ सिस्टम मॉडेलिंग'चा (इएसएम) ही विकास करण्यात येत आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होऊ शकते, असेही डॉ. राघवन यांनी सांगितले.

- 1901 ते 2018 दरम्यान भारताच्या सरासरी तापमानात 0.7 अंश सेल्सिअसने वाढ व भविष्यातही वाढ होण्याचा अंदाज 
- भारत सरकारच्या वतीने हरितगृह वायूच्या (ग्रीनहाऊस गॅसेस) उत्सर्जनास कमी करण्यासाठी अनेक उपक्रमाची सुरुवात
- आयआयटीएमतर्फे इएसएम-1च्या यशानंतर 'आयआयटीएम इएसएम-2' विकसित करण्यात आले.
- 'इएसएम'मधील विकासामुळे हवामानशास्त्र, शेती, संरक्षण, जलस्त्रोत, वन, आरोग्य, अक्षय ऊर्जा, अंतराळ आणि अणुऊर्जासारख्या विविध क्षेत्रात करिअरच्या संधी

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Numerical Weather Forecasting System (NWP) is useful for forecasting changing weather said Krishnan Raghavan