Fight With Corona : 'हा अनुभव संयम, शिस्तीचे धडे देणारा : प्रेरणा जगताप

Nurse Prerana jagtap is Helping Corona Patient to recover in pune.jpg
Nurse Prerana jagtap is Helping Corona Patient to recover in pune.jpg

पुणे : घरातील सख्या बहिणी एवढचं नव्हे तर चुलत बहिणींनी देखील वैद्यकीय सेवेचे क्षेत्र निवडले, म्हणून आपसुक त्यांचा ओढा वैद्यकीय सेवेकडे झुकला. आरोग्य सेवेची लहानपणापासून असलेली आवडीमुळे त्या परिचारिका झाल्या. आता कोरोनाग्रस्तांची सेवा करताना जीवनातील महत्त्वाचे धडे मिळाल्याचे त्या आवुर्जन सांगत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

औंध येथील जिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून त्या' म्हणजेच प्रेरणा जगताप काम करत आहेत. "वेगवेगळ्या आजार, साथीचे रोग या काळात सेवा केली, पण कोरोनाचा संसर्ग वाढत असताना तो रोखण्याचा प्रयत्नात संयम, शिस्त आणि निरोगी आरोग्य अशी जीवनशैलीत सहजतेने आत्मसात करण्याचे धडे मिळाले,'' असा अनुभव त्या सांगत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मुळच्या उस्मानाबाद येथील असणाऱ्या प्रेरणा यांचे सोलापूरमधील माळशेज हे सासर. परंतु नोकरीनिमित्त त्या सतत प्रवास करत राहिल्या. सुरवातीला उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात परिचारिका म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर काही वर्षे सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात सेवा रूजू केली. आता त्या औंध जिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका (स्टाफ नर्स) म्हणून कार्यरत आहेत. जवळपास 23 वर्षांच्या सेवेत प्रेरणा यांच्या अनेक कडू-गोड आठवणी आहेत. परंतु या सगळ्यात कायम लक्षात राहिल तो कोरोनाचा संसर्ग असताना केलेले काम आणि आलेला अनुभव, असेही त्या प्राजंळपणे सांगतात. त्याची मुलगी सध्या दहावीत असून पती खासगी कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. "माझी मोठी बहिण परिचारिका, तर दुसरी बहिण वैद्यकीय महाविद्यालयात आहे. तर चुलत बहिणी देखील वैद्यकीय क्षेत्रात आहेत. त्यामुळे मलाही लहानपणापासून या क्षेत्राबद्दल प्रचंड कुतूहल होते,'' असे त्यांनी सांगितले.

पुणेकरांच्या दिवसाची सुरुवात 'या' गोड बातमीने


कोरोनाग्रस्तांच्या वॉर्डची जबाबदारी सध्या प्रेरणा यांच्याकडे आहे. रुग्णालयात गेल्यावर कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी आवश्‍यक वस्तू, औषधे, उपकरणे यांचा पुरवठा पाहणे, रुग्णांना जेवण-औषधे वेळेवर दिली जात आहेत की नाही यावर लक्ष देणे, परिचारिका आणि अन्य कर्मचारी यांच्या कामांची विभागणी आणि नियोजन करणे, अशी अनेक महत्त्वाची कामे त्या पार पाडत आहेत.

"बारामतीतील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 44 जणांचे रिपोर्ट्स... 

"मला स्वत:ला मधुमेह आणि हायपर टेन्शनचा आजार गेल्या काही वर्षांपासून आहे. परंतु या काळात न डगमगता काम करत आहे. कोरोनाच्या रुग्णांना उपचार देण्याबरोबरच त्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देत समजाविणे महत्त्वाचे असते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनाही धीर देणे आवश्‍यक असते,''
- प्रेरणा जगताप, अधिपरिचारिका, औंध जिल्हा रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com