सावधान : तुमच्या वाढत्या पोटाबरोबर वाढतोय कोरोनाचा धोका

obese person will have more risk getting covid 19 affected
obese person will have more risk getting covid 19 affected

पुणे Coronavirus : पोटाचा घेर वाढलेल्या प्रत्येकासाठी ही बातमी म्हणजे धोक्याची घंटा आहे. कारण, वाढत्या पोटाबरोबरच कोरोनाचा धोकाही वाढतोय. पोटाचा घेर जास्त असणे म्हणजे त्या व्यक्तीमध्ये अनावश्यक फॅट जास्त आहेत. त्याचा थेट परिणाम मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार असे आजार त्यातून वाढत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे पोटाचा घेर जास्त असणऱयांना धोका वाढत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

लठ्ठपणामुळे होणारी गुंतागुंत
जाड लोकांमध्ये मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाबाचे विकार वाढतातच. या आजारांमुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या उपचारांमधील गुंतागुंत वाढते. लठ्ठपणामुळे शरीरात निर्माण होणारी गुंतागुंत त्यातच कोरोनाच्या संसर्गाची भर पडते. लठ्ठपणा, इतर विकार आणि कोरोना यांच्यावर एकाच वेळी उपचार करण्याचे आव्हान वैद्यकीय तज्ज्ञांपुढे असते. त्यातून शरीराकडून उपचारांना मिळणारा प्रतिसाद मंदावण्याचा धोका असतो. 

परदेशातील ट्रेंड
स्थुलता असलेल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचा ट्रेंड युरोपीय देशांमध्ये आणि अमेरिकेत दिसतो. 

भारतातील ट्रेंड
भारतात स्थुलतेबरोबरच मधुमेह असणाऱया कोरोनाबाधी रुग्णांना उपचारांसाठी रुग्णायात दाखल करावे लागणार आहे. आपल्याकडे जाडी नसली तरीही शरीरातील फॅटच्या (चरबी) प्रमाणामुळे मधुमेही रुग्णांची संख्या मोठी आहे. हे फक्त वजनावर नाही, तर तुमच्या शरीरात किती टक्के फॅट आहे त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खूप जाड नसलेल्या व्यक्तीत फॅटचे प्रमाण जास्त असेल तरीही ते धोक्याचं लक्षण आता मानलं पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे  क्लिक करा

कोणते रुग्ण अत्यवस्थ होतात?
देशातील कोरोना पाँझिटीव्ह असलेले कोणते रुग्ण अत्यवस्थ होतात, याचा अभ्यास सुरू आहे. सध्या मृत्यूमुखी पडणाऱयांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडविकार, श्वसनाचा आजार अशी इतर कोणती न कोणती कारणे दिसतात. या सगळ्या आजारांचं मुळ कारण रुग्णाच्या शरीरातील फॅट जास्त आहे, हे पहाण्याची वेळ आली असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

भविष्यातील साथरोग रोखण्यासाठी
विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी सामहुक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) महत्त्वाची असते. पण, त्यासाठी नागरिकांचे आरोग्य सुदृढ असणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी साथरोगात सामुहिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मधुमेह हृदयरोग, श्वसनाचे विकार अशांवर नियंत्रण ठेवणे गरचेचे आहे. तसेच, या सगळ्यांचे मूळ कारण असलेल्या लठ्ठपणा कमी करण्यावर भविष्यात भर दिला पाहिजे.   

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे  क्लिक करा

बीएमआय आणि कोरोना

  • इंग्लंडमध्ये झालेल्या अभ्यासातील निष्कर्ष : बाँडी मास इंडेक्स (बीएमआय) म्हणजे वजन उंचीचं प्रमाण 30 पेक्षा असलेल्या रुग्ण अत्यवस्थ होण्याचा धोका 33 पटीने वाढला
  • कोरोनाच्या उपचारांसाठी अतीदक्षता विभागात दाखल रुग्णांमध्ये 34 टक्के रुग्णांचे वजन जास्त होते. 31 टक्के लठ्ठ आणि 7 टक्के अतीलठ्ठ होते.
  • 25 पेक्षा जास्त बीएमआय असणाऱयांना कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण जास्त असले, असे वल्ड ओबेसिटी फेडरेशनने म्हटले आहे.

भारत लठ्ठपणात पाचव्या स्थानावर
सर्वाधिक लठ्ठ लोकांच्या संख्येत भारत जगात पाचव्या स्थानावर असल्याचे 2016 साली लॅन्सेट या नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे. जगभरातल्या लठ्ठ पुरुषांपैकी 3.7 टक्के पुरूष भारतात आहेत. तर, लठ्ठ महिलांपैकी 5.3 टक्के महिला याच देशात असल्याचे यात नमूद केले आहे. 

पोटाच्या वाढत्या घेराचा धोका

  • फॅटमुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते
  • हृदयाची कार्यक्षमता आणि रक्ताभिसरणावर परिणाम होतो
  • शरीरातील आँक्सिजनची मागणी वाढून श्वसन संस्थेवरचा ताण वाढतो
  • मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळे येतात अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्गामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो
  • अशा व्यक्तींमध्ये रोगप्रतिकाशक्ती कमी असल्याने विषाणूंचा ससर्गाला प्रतिकार करू शकत नाही

धोका टाळण्याचे उपाय

  • कमी उष्मांकाचा चौरस आहार घ्या
  • फॅट असणारे पदार्थ आहारातून टाळा
  • नियमित व्यायाम

भारतीयांमध्ये कमी वजनातही फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोटाचा घेर आणि मधुमेहींवरवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. लाँकडाऊनमध्ये या आजारांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यातून वजन वाढणे, मधुमेहावरचे नियंत्रण सुटण्याचा धोका आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात या रुग्णांना केंद्रस्थानी ठेऊन उपचारांची व्यवस्था उभारणे, ही काळाची गरज आहे,

- डॉ. शशांक शहा, लॅप्रो ओबेसो सेंटर,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com