आईच अल्पवयीन मुलीला म्हणाली, ते जसं सांगतिल तसं कर...  

नितीन बारवकर
Thursday, 13 August 2020

शिरूर येथील एका घटस्फोटीत महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्याच १४ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा व धमकावून तीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शिरूर (पुणे) : शिरूर येथील एका घटस्फोटीत महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्याच १४ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा व धमकावून तीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित मुलीने आपल्या मामा- मामीच्या मदतीने शिरूर पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रेमी जोडगोळीला गजाआड केले. सध्या त्यांची रवानगी येरवड्याच्या कारागृहात करण्यात आली आहे. 

अरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात 

याबाबत शिरूर पोलिसांनी माहिती की, विजय अर्जुन पाटील (रा. खारामळा, शिरूर) याच्यासह त्याच्या प्रेयसीवर शिरूर पोलिसांनी विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानूसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला असून, शिरूर न्यायालयाने या प्रेमी युगुलाला न्यायालयीन कोठडी दिली.  रांजणगाव एमआयडीसीत ठेकेदारी करणाऱ्या विजय पाटील यांचे तीस वर्षीय घटस्फोटितेशी सूत जुळले. त्यानंतर त्याने तीला शिरूरमधील सैनिक सोसायटीत खोली घेऊन दिली. मूळची दौंड तालुक्यातील ही घटस्फोटिता १४ वर्षाच्या मुलीसह शिरूरमध्ये राहावयास आली. त्यानंतर विजय पाटील तीला वारंवार भेटत होता. दोघे एकत्र दारू पीत असत. 

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव

दरम्यान, पाटील याची नजर प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर पडली. त्याने तीच्याशी लगट वाढवून मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. यास मुलीने विरोध केला असता, 'हे तुझे वडीलच आहेत, त्यांना पप्पा म्हणत जा, आणि जसे म्हणतील तसे करीत जा,' अशा शब्दांत तीच्या आईने दरडावले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याला संबंधित मुलीने विरोध केल्यानंतर विजय पाटील याने हा प्रकार कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने मामा- मामींशी संपर्क साधून त्यांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शिरूरला येऊन संबंधित अल्पवयीन मुलीसह पोलिस ठाणे गाठले. संबंधित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विजय पाटील व त्याच्या प्रेयसीविरूद्ध रविवारी (ता. ८)  गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोघेही पळून गेले. परंतु, पोलिसांनी वेगवान हालचाली करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. दोघांनाही अटक करण्यात आली असून, शिरूर न्यायालयाने, न्यायालयीन कोठडी दिल्याने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. याबाबत पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obscene act with a minor girl by a mother's boyfriend at Shirur