शिक्रापूरची 2 कोटींची विकासकामे अडविली; सरपंच-उपसरपंचांचा उपोषणाचा इशारा

obstruction of development works worth Rs 2 crore in Shikrapur
obstruction of development works worth Rs 2 crore in Shikrapur

शिक्रापूर : ग्रामपंचायत निधीतील कामांच्या ई-निविदा प्रसिद्ध करण्याच्या प्रशासकीय तांत्रिक त्रुटी पुढे करुन तब्बल दोन कोटींच्या विकासकामांना स्थगित करण्याचा अजब कारभार शिरुर पंचायत समिती स्तरावर झाला आहे. तब्बल दोन महिन्यांपासून पाठपूरावा करीत असलेल्या शिक्रापूर ग्रामपंचायतीने ही बाब गटविकास अधिकऱ्यांच्या निदर्शनास आणून देताच शिक्रापूर ग्रामसेवकांनाच सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा उद्योग शिरुर पंचायत समिती स्तरावर झाल्याने शिक्रापूर सरपंच हेमलता राऊत यांनी थेट बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या या आर्थिक वर्षातील एकुण २ कोटी १० लाखांच्या विकासकामांची मंजुरी प्रक्रीया पूर्ण होवून तिचे मुल्यांकनही पंचायत समितीस्तरावर पूर्ण झाले. याबाबत ग्रामपंचायतीने तसा पाठपूरावा करुन सदर कामांचे ई-टेंडरींगही पूर्ण झाले. याबाबत काही त्रांत्रिक त्रुटींबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अर्ज देताच निवीदा ज्या प्रशासन अधिकाऱ्यांनी राबविली त्यांनाच विचारुन सदर प्रक्रिया पुन्हा राबवून हे काम तात्काळ सुरू करण्याची प्रक्रीया पंचायत समिती स्तरावर होण्याऐवजी या कामी सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांचेकडे १७ जुलै रोजी चौकशी सोपवून पंचायत समिती मोकळी झाली. दरम्यान याबाबत पुन्हा गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत ई-निवीदा करु नये असे पत्रच ६ ऑगष्ट रोजी काढले आहे. यावर कडी म्हणजे ग्रामपंचायतीला कुठलीच प्रशासकीय प्रक्रीया राबविता येवू नये म्हणून कोरोनाने हैरान शिक्रापूरातील ग्रामविकास अधिकारी यांना तात्पूरते म्हणून निमगाव म्हाळूंगीला वर्ग केले तर शिक्रापूरात सणसवाडीचे बी.एच.पवने यांना नियुक्त केले.  या सर्व घडामोडींमध्ये गावच्या तब्बल दोन कोटींच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनांनाच स्थगित करुन शिरुर पंचायत समितीने एकुणच पंचायत राज व्यवस्थेलाच उध्वस्थ करण्याचा डाव आखल्याने आम्ही आमची कामे तात्काळ सुरू करुन न दिल्यास सामुहिकरित्या बेमुदत उपोषणास बसत असल्याचा इशारा सरपंच हेमलता राऊत व उपसरपंच जयश्री दोरगे यांनी दिला. 

रात्रभर पाऊस; खडकवासला धरणाचे एक फुटाने उघडले सहा दरवाजे

याबाबत गटविकास अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ग्रामविकास अधिकारी बी.बी.गोरे यांचेकडे शिक्रापूरचा अतिरिक्त  चार्ज असून तिथे मुळ नवले म्हणून नियुक्त आहेत. या संपूर्ण प्रक्रीयेच्या पार्श्वभूमीवर आपण नवले यांना तात्काळ हजर होण्याचे आदेश देत आहोत. दरम्यान शिक्रापूरच्या दोन कोटींच्या कामांबाबत तूर्तास मला बोलता येणार नाही. मी नंतर याबाबत सविस्तर बोलेन.  
        
निवीदेची त्रुटी प्रशासकीय, मग विकासकामांचा फटका शिक्रापूरकरांना का...?
मंजुर कामांच्या निवीदा कधी, कशा काढायच्या ही संपूर्ण प्रक्रीया प्रशासकीय पातळीवर राबविली जाते. याबाबत प्रशासकीय दोष दूर करुन एखाद्या गावाला दोन कोटींच्या विकासकामांना हातभार लावायचे काम प्रशासकीय पातळीवर करायला हवे. मात्र हे न करता जिल्हा परिषद प्रशासनाने आता शिरुर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कामांच्या निवीदा प्रक्रीया योग्य आहे की, नाही हे कळवावे आणि प्रशासकीय बोगस कामकाजाचा फटका शिक्रापूरकरांना बसू देवू नये. याबाबत तात्काळ निर्णय घ्या अन्यथा बेमुदत उपोषण तात्काळ सुरू करीत असल्याचा इशारा राऊत यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com