Nilesh Rane News : नीलेश राणेंविरोधात अश्लील भाषेत ट्विट; पुण्यात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nilesh Rane

Nilesh Rane News : नीलेश राणेंविरोधात अश्लील भाषेत ट्विट; पुण्यात गुन्हा दाखल

सोशल मीडियावर भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि अश्लील ट्विट केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात राहुल मगर या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुणे सायबर पोलिस विभागात या प्रकरणी योगेश शिंगटे यांनी तक्रार दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ११ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान घडली. राहुल मगर या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाउंट @राहुलमगर32 याने भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांच्या ट्विटर हॅण्डल @meNeelesNRane यावर अश्लील भाषेत ट्विट केले होते.

तसेच ठाण्यातील शिवानी गोखले नावाच्या महीलेबद्दल देखील या राहुल मगर नावाच्या व्यक्तीने ६ मार्च रोजी ट्विटर वर अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेत ट्विट केले होते.

या प्रकरणी पुण्यातील सायबर पोलिस विभागात तक्रार दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणी राहुल मगर या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :BjpPune News