पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विद्यापीठात बेमुदत लेखणी बंद आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

विद्यापीठ कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांच्या विविध मागण्या यापूर्वी राज्य सरकारकडे पोचविल्या आहेत, मात्र राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही.त्यामुळे विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी यांच्यात सरकारच्या दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेविषयी नाराजी आहे. वारंवार मागण्या करूनही सरकार त्याकडे गांभीर्यने पाहत नसल्याने अखेर पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समितीतर्फे एक ऑक्टोबरला सकाळी आंदोलन करण्यात आले आहे.

पुणे, : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तब्बल ३७ वर्ष सेवा केल्यानंतर सुरेंद्र नायडू हे २०१७मध्ये शिक्षण अधिकारी म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या दोन मुलींपैकी एकीचे लग्न व्हायचे आहे. पण आता सरकारने आश्वासित प्रगती योजना रद्द केल्याने तिचे लग्न कसे करायचे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. "ही योजना रद्द झाली आणि सरकारने निवृत्ती वेतनात कपात सुरू केली. दर महिन २८ हजार निवृत्ती वेतन मिळणे अपेक्षित असताना हातात १२ हजार रुपये पडत आहेत. तर ग्रॅज्युटी १५ लाख रुपये कमी केले आहेत. त्यामुळे आता मुलींचे लग्न कसे करू", असे सांगत नायडू यांनी आपली व्यथा मांडली.

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठात काम करून निवृत्त झालेले बरसात नायडू यांच्याप्रमाणे अनेक निवृत्त अधिकारी, कर्मचारी, तसेच सध्या कार्यरत असणारे कर्मचारी सरकार दफ्तरी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून वारंवार हेलपाटे मारत होते. मात्र सरकारने दखल न घेतल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २४ सप्टेंबरपासून लेखनी बंद आंदोलन सुरू केले आहे.

अकृषी विद्यापीठाच्या शिक्षकेतर पदांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा, रद्द केलेली आश्‍वासित प्रगती योजना पुनर्जीवीत करावी, पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्या मान्य न झाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आता हे आंदोलन अधिक तीव्र केले असून गुरूवारपासून हे आंदोलन बेमुदत असणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर जवळपास शंभर-दिडशे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या अंतर्गत आंदोलन केले.

आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास

विद्यापीठ कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांच्या विविध मागण्या यापूर्वी राज्य सरकारकडे पोचविल्या आहेत, मात्र राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी यांच्यात सरकारच्या दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेविषयी नाराजी आहे. वारंवार मागण्या करूनही सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने अखेर पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समितीतर्फे हे आंदोलन करण्यात आले आल्याची माहिती सहचिटणीस शिवाजी उत्तेकर यांनी सांगितले. समितीचे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी व उपाध्यक्ष डॉ. सुनील धिवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सध्या विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरु आहे, असे असताना आंदोलन झाल्याने विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

कुरकुंभमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; लागोपाठ स्फोटांनी परिसर हादरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers and employees of Pune University stop writing at the university