फराटे पाटील महाविद्यालयात शासनाचे अधिकृत प्रवेश प्रक्रिया केंद्र  

educ.jpg
educ.jpg

मांडवगन फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील वसंतराव फराटे पाटील महाविद्यालयात तंत्र शिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ऑनलाईन प्रवेश सुविधा केंद्र ( फॅसिलिटेशन सेंटर ) सुरु झाले आहे अशी माहिती राजीव फराटे पाटील यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी २५ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी असे आवाहन फराटे पाटील कॉलेजचे अध्यक्ष राजीव पाटील फराटे यांनी केले आहे. भारतीय नागरिकत्व असलेला विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत किमान  35 टक्के गुणांनी पास असावा. यामध्ये प्रवेश पात्रता धारण केलेला विद्यार्थी येथील सुविधा केंद्रामार्फत महाराष्ट्रात कोठेही प्रवेशासाठी पात्र असणार आहेत.

विद्यार्थ्यांना या केंद्रामार्फत त्यांचा कल आणि  मागणी असलेल्या पदविका औषधनिर्माण अभ्यास क्रमांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आता पदविका औषधनिर्माणशास्त्र  शिक्षण पूर्ण केल्यावर भविष्यातील संधी जाणून घेण्यासाठी आता कोठेही जाण्याची गरज नाही. 

या संधीचा फायदा जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी फराटे पाटील औषध निर्माणशास्त्र  महाविद्यालय येथे सुविधा केंद्राला भेट देऊन ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. उमेदवारांच्या जातीनिहाय संवर्गानुसार आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती साठी या केंद्रातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तज्ञ प्राध्यापकांची या केंद्रात नेमणूक करण्यात आली आहे.

शिष्यवृत्या, शैक्षणिक कर्ज व त्यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे  या संदर्भात सखोल माहिती येथे मिळणार आहे. या केंद्रामार्फत ऑनलाईन नोंदी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन  छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चिती करणे इत्यादी प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. विकल्प (ऑपशन्स) देणे, मेरिट लिस्ट घोषित करणे, प्रवेश फेऱ्या इत्यादी बाबींचे वेळापत्रक डीटीई मार्फत लवकरच जाहीर केले जाणार आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com