''अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पारदर्शी पध्दतीने पंचनामे करणे गरजेचे''

डॉ. संदेश शहा
Saturday, 24 October 2020

कोरोना महामारीचे आजपर्यंत तालुक्यात 3110 रुग्ण झाले असून त्यात शहरी 499 तर ग्रामीण भागात 2611 रुग्ण आहेत. पैकी 2795 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

इंदापूर : महा अति वृष्टीमुळे सोलापूर जिल्हा, बारामती, दौंडपेक्षा सर्वाधिक नुकसान इंदापूर शहर व तालुक्याचे झाले आहे. त्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्यापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पारदर्शी पध्दतीने पंचनामे करणे गरजेचे आहे. जर एखाद्या शेतकऱ्याचा पंचनामा कागदावर आला नाही तर त्यास संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल. सर्व अधिकाऱ्यांनी सोमवार (ता. २६) पर्यंत पंचनाम्याची प्रत माझ्यासह तहसीलदार यांच्याकडे जमा न केल्यास त्यांना शेतकरी व जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट उपस्थित होते.

होम क्वारंटाईन झाल्यानंतरही अजित पवारांचा कामाचा धडाका सुरूच

राज्य मंत्री भरणे पुढे म्हणाले, ''या महा अति वृष्टीमुळे बंधारे, शेतातील माती, उभी पिके, पशुधन, घरे याचे अतोनात नुकसान झाले आहे. बंधाऱ्याचे सांडवे फुटले आहेत, भराव खचले आहेत. ३३ पाझर तलावांचे नुकसान झाले आहे तर, डाळिंब, ऊस व इतर पिकांचे अत्यंत नुकसान झाले आहे. यंदा व्यापाऱ्यांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे 3404 घरात पाणी घुसून 513 घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जागेवर बसून पंचनामे न करता बांधावर जाऊन पंचनामे केल्यास तालुक्याच्या संपूर्ण नुकसानीचे यथार्थ चित्र शासनाकडे पाठविता येईल. त्याचा पाठपुरावा करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,'' अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोरोना महामारीचे आजपर्यंत तालुक्यात 3110 रुग्ण झाले असून त्यात शहरी 499 तर ग्रामीण भागात 2611 रुग्ण आहेत. पैकी 2795 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एकूण 117 रुग्ण मरण पावले असून त्यात 21 शहरी तर 96 
ग्रामीण रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी व करता शासन निर्देशांचे पालन करावे असे आवाहन मंत्री भरणे यांनी शेवट केले.

बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!​

यावेळी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी आपला आढावा सादर केला. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याने नदीकाठची जनावरे पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे पंचनामे करण्यास अडचण येत आहे असे सांगितले. यावेळी ''वाहून गेलेली जनावरे कर्नाटकाला गेली असतील मात्र, त्यासाठी पंचनामे थांबवू नका,''अशी प्रतिक्रिया मंत्री भरणे यांनी देताच त्याचे उस्फुर्त स्वागत झाले. 
 

धक्कादायक! नकाशात नाही रस्ता पण मंजूर झाला तब्बल 161 कोटींचा निधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officials need to go to the actual farm and conduct panchnama in a transparent manner