पुणे : गांजवे चौकात भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत वृद्ध नागरिकाला चिरडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हा त्याच्या ताब्यातील खासगी ट्रॅव्हल्स बस वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत भरधाव चालवित होता. त्याची बस लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील गांजवे चौकामध्ये सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास आली. त्यावेळी पायी जाणाऱ्या 60 ते 62 वर्षीय नागरिकास जोरदार धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

पुणे : ऐन गर्दीच्या ठिकाणावरुन भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने पायी जाणाऱ्या वृद्ध नागरीकास जोरदार धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील गांजवे चौकामध्ये गुरूवारी रात्री सव्वा आट वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी दिलीप विठ्ठल चव्हाण (वय 45, रा. मालेगाव रोड, चाळीसगाव, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हा त्याच्या ताब्यातील खासगी ट्रॅव्हल्स बस वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत भरधाव चालवित होता. त्याची बस लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील गांजवे चौकामध्ये सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास आली. त्यावेळी पायी जाणाऱ्या 60 ते 62 वर्षीय नागरिकास जोरदार धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

आणखी वाचा - भजी तर महागलीच; मटण थाळी 400 रुपये होणार?

आणखी वाचा - सिंचन गैरव्यवहारातून अजित पवार सुटले

मृत व्यक्तीच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा पायजमा कुर्ता परिधान केला आहे. दरम्यान, अपघातानंतर चालकाने पोलिसांना माहिती न देता, घटनास्थळावरून पळ काढला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Older citizen dies in hitted by Travel bus at ganjave Chowk in Pune