मुंबई-पुण्यात ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात; डॉ. प्रदीप आवटेंचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Pradeep Awate
मुंबई-पुण्यात ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात; डॉ. प्रदीप आवटेंचा दावा

मुंबई-पुण्यात ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात - डॉ. प्रदीप आवटे

पुणे : मुंबई आणि पुणे शहरामध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं चित्र आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर याचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यात ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा, आयसर या संस्थेच्या हवाल्यानं राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केला आहे.

हेही वाचा: राणेंना नोटीस देऊन साक्षीसाठी बोलावणं हा कायदेशीर गुन्हा - फडणवीस

डॉ. आवटे म्हणाले, आपल्याकडे समुहिकरित्या ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचं आयसर या संस्थेच्या प्राथमिक अहवालातून समोर आलं आहे. पण यामधील चांगली गोष्ट अशी आहे की, ओमिक्रॉनचा संसर्ग हा अत्यंत सौम्य स्वरुपात दिसतो आहे. जसं की काल मुंबईत अडीज हजारांहून अधिक रुग्ण आढळले परंतू यामध्ये लक्षण नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. लक्षणं कमी, रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी तसेच मृत्यूचं प्रमाण कमी असलं तरी हा संसर्ग वाढू नये यासाठी आपण सर्वांनी कोविडसाठी जे अनुरुप वागणं आहे, ते अंगिकारण्याची गरज आहे.

हेही वाचा: भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण

पुण्यातील आयसर या संस्थेनं राज्यातील वाढत्या ओमिक्रॉन संसर्गाचं सर्वेक्षण केलं. यामध्ये ३८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये मुंबई आणि पुण्यात सामुहिक संसर्गाचं प्राथमिक निदान करण्यात आलं. ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने होत असला तरी रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचं आवटे यांनी सांगितलं. तरीही काळजी घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: 'तिसरी लाट भयानक असू शकते, ओमिक्रॉन तीनपट वेगाने वाढतोय'

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी आज तातडीची टास्कफोर्सची बैठक बोलावली आहे. यामध्ये याबाबत सविस्तर चर्चा होईल. त्यानंतर राज्यात निर्बंध वाढवण्याची घोषणा देखील होऊ शकते.

Web Title: Omicron Mass Infection Begins In Mumbai And Pune Dr Pradeep Awate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsOmicron Variant