पुणे : तरुणींकडे पाहून अश्‍लिल वर्तन; तरुणास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

- स.प.महाविद्यालयाजवळून वसतिगृहाकडे जाणाऱ्या तरुणींकडे पाहून अश्‍लिल हावभाव करीत त्यांचा केला विनयभंग.

पुणे : स.प.महाविद्यालयाजवळून वसतिगृहाकडे जाणाऱ्या तरुणींकडे पाहून अश्‍लिल हावभाव करीत त्यांचा विनयभंग करणाऱ्यास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने काही तरुणींचा याच पद्धतीने विनयभंग केल्याचा प्रकार पुढे आला असून, त्याच्याविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

निखील रामदार फाटे (वय 25, रा. दांडेकर पूल) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी तिच्या मैत्रीणीसमवेत बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स.प.महाविद्यालयाजवळून त्यांच्या वसतिगृहावर जात होती. दोघीही स.प.महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहसमोर आल्या, त्यावेळी दुचाकीवर थांबलेल्या फाटे याने तोंडाला रुमाल बांधून फिर्यादी तरुणीकडे पाहून अश्‍लिल भाषा वापरली. त्यानंतर त्यांच्याकडे पाहून अश्‍लिल चाळे करीत त्यांच्या मनास लज्जा येईल, असे वर्तन करीत तिचा विनयभंग केला.

मी पुन्हा आलो; पण एवढ्या सकाळी सकाळी... 

तसेच या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास बघून घेईल, अशी धमकी दिली. दरम्यान, याच स्वरुपाचा प्रकार फिर्यादीच्या आणखी एका मैत्रीणीबाबत घडल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणाची दत्तवाडी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन त्यास अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Arrested for Misbehave infront of Girls in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: