पुणे : क्रेनला ओव्हरटेक करायला गेला अन्...

Accident
Accident

सिंहगड रस्ता : सनसिटी रस्ता येथील आनंदनगर परिसरात क्रेन आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

सनसिटी रस्ता परिसरातून महामार्गाकडे जाणाऱ्या सन एम्पायर फेज टू या सोसायटीसमोर हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गाकडे क्रेन आणि दुचाकीस्वार जात होते. क्रेनला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी क्रेनला धडकली. दुचाकीस्वार खाली पडला. तेव्हा त्याच्या डोक्यावरून क्रेनचे मागील उजवे चाक गेले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र शूर (वय 35) असे मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. 

दरम्यान क्रेन चालक आणि आणि त्याच्या सहकाऱ्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पकडण्यासाठी धावाधाव केली. यात एकाला पकडण्यात यश आले असून, एकजण फरार आहे. पुढील तपास सिंहगड पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com