ह्रदयद्रावक : मुलगा व वडील निघाले रस्त्याने, पण काळाने घातला घाव  

कल्याण पाचांगणे
Friday, 4 December 2020

माळेगाव-नीरा राज्यमार्गावर कवठेकरवस्ती येथे दूध टॅंकर व मोटरसायकलची समोरासमोर धकड होऊन मोटारसायकलस्वार ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.

माळेगाव : माळेगाव-नीरा राज्यमार्गावर कवठेकरवस्ती येथे दूध टॅंकर व मोटरसायकलची समोरासमोर धकड होऊन मोटारसायकलस्वार ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

विशेषतः आपघातग्रस्त मोटारसायकलवर वडील व मुलगा नीरेच्या दिशेने प्रवास करीत होते. त्यामध्ये वडील नवनाथ भानुदास साबळे (वय ५०, रा. थोपटेवाडी-कोऱ्हाळे, ता.बारामती) हे जागीच मयत झाले, तर मुलगा शुभम नवनाथ साबळे (वय २२) हा गंभीर जखमी झाला आहे.

खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कचऱ्याचे ढीग; व्यावसायिकांकडून होतेय विद्रुपीकरण

बारामती शहरातील खासगी हाॅस्पीटलमध्ये शुभम याच्यावर पुढील वैद्यकिय उपचार सुरू आहे. परंतु शुभमची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकिय सूत्रांनी दिली. दरम्यान, माळेगाव पोलिसांकडे वरील अपघाताची जखमीच्या नातेवाईकांकडून फिर्याद दाखल झाली नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिणामी संबंधित दूध टॅंकर चालकावर अद्याप गुन्हा नोंदविला गेला नाही, असे असले तरी अपघात ग्रस्त दूध टॅंकर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच वरील प्रकरणी प्रथमदर्शनी पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed in Malegaon accident

Tags
टॉपिकस
Topic Tags: