esakal | खडकवासला चौपाटी परिसरात वाहनांची एक किलोमीटरची रांग
sakal

बोलून बातमी शोधा

खडकवासला चौपाटी परिसरात वाहनांची एक किलोमीटरची रांग

खडकवासला चौपाटी परिसरात वाहनांची एक किलोमीटरची रांग

sakal_logo
By
शरयू काकडे

खडकवासला : धरण चौपाटी परिसरात येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी हवेली पोलिसांनी धरण चौपाटी या ठिकाणी नाकाबंदी उभारली होती. अनेक पर्यटक दिवसभर या ठिकाणी येत होते. संध्याकाळी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहनांची रांग एक- दीड किलोमीटर लागली होती.

मागील काही महिने कडक लॉकडाऊन असल्यामुळे नागरिक घरात होते. मागील पंधरवड्यापासून लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले. पावसाळा सुरु असल्यामुळे परिणामी शहर परिसरातील नागरिक सध्या खडकवासला सिंहगड पानशेत परिसरात फिरण्यासाठी बाहेर पडले होते.

हेही वाचा: कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; दरडी पडण्याची शक्यता

पर्यटन, ऐतिहासिक ठिकाणे अद्याप सुरू झालेली नाहीत. तसेच, शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्या व उपलब्ध बेड नुसार संदर्भात शहर दुसऱ्या पातळीवर आहे. तर जिल्हा हा चौथ्या पातळीवर आहे. येथे लॉक डाऊनचे निर्बंध कडक आहेत. असे असताना देखील पर्यटक फिरण्यासाठी या परिसरात आले होते.

मागील आठवड्यात पर्यटकांनी गर्दी केल्याने यावेळी येणाऱ्या व्यक्तीकडून पाचशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला होता. आज नाकाबंदीच्या ठिकाणी आलेल्या वाहनांची तपासणी करून पाचशे रुपये दंड आकारून त्यांना परत पाठविण्यात येत होते. संध्याकाळी नाकाबंदीच्या ठिकाणी वाहन तपासणी केली जात होती. पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहनांची रांग चौपतीच्या मध्यापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत गेली होती. या वाहनांच्या रांगामुळे खानापूर, पानशेत परिसरात जाणाऱ्या स्थानिक नागरिकांना घरी परत येताना या वाहन रांगेचा फटका बसला आहे.

हेही वाचा: दक्षिण रेल्वेमध्ये हजारों अ‍ॅप्रेंटीस पदांसाठी भरती, असा करा अर्ज

"अशाप्रकारे आज धरण परिसरात आणि डोणजे गोळेवाडी या ठिकाणी सुमारे 132 वाहन व व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. यामधून 47 हजार 600 रुपयांचा दंड जमा करण्यात आलेला आहे." अशी माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली

अचानक नियम बदलल्यामुळे अनेकांना फटका

मागील आठवड्यात या परिसरातील अनेक हॉटेल पर्यटकांना सुरू झाली आहेत. त्यामुळे, अनेकांनी येथे हॉटेल जेवणासाठीचे टेबल आरक्षित केली होती. त्यांना प्रथम खडकवासला व नंतर गोळेवाडी डोणजे येथे दोन ठिकाणी दंड भरून जेवणास जावे लागले. तर काही जणांनी पोलिसांनी दंड भरण्यासाठी थांबविल्याने जेवणाचा बेत रद्द करून घरी परतण्याचा निर्णय घेतला.

loading image