पुणे जिल्ह्यात मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक लाख पोस्ट खाती

सुकन्या समृद्धी योजनेकरिता जिल्ह्यात एका वर्षात तब्बल एक लाख दोन हजार ७६५ पोस्ट खाती उघडण्यात आली आहेत.
sukanya samruddhi yojana
sukanya samruddhi yojanasakal
Summary

सुकन्या समृद्धी योजनेकरिता जिल्ह्यात एका वर्षात तब्बल एक लाख दोन हजार ७६५ पोस्ट खाती उघडण्यात आली आहेत.

पुणे - सुकन्या समृद्धी योजनेकरिता (Sukanya Samruddhi Yojana) जिल्ह्यात एका वर्षात तब्बल एक लाख दोन हजार ७६५ पोस्ट खाती (Post Account) उघडण्यात आली आहेत. केंद्र सरकारने (Central Government) मुलीच्या (Girl) उज्ज्वल भविष्यासाठी (Future) ही योजना सुरू केली असून, नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ही माहिती पुणे टपाल विभागाने दिली.

टपाल विभागाकडून ही योजना घराघरांत पोचविली जात आहे. मुलींच्या कल्याणासाठी ही योजना असल्याने सर्व पालकांनी तिचे भविष्य सुरक्षित करावे, अशी जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी पोस्टमनसह विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विभागाने यावर्षात ठेवलेले ७५ हजार खाती उडण्याचे ध्येय कधीच पूर्ण केले आहे. ३१ मार्चपर्यत एकूण एक लाख २५ हजार खाती उघडण्याच्या प्रयत्न केला जाणार आहेत. टपाल विभागावर विश्वास असल्याने नागरिक पुढाकार घेऊन त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी खाते उघडत आहेत, असे पोस्ट मास्तर जनरल मधुमिता दास यांनी सांगितले.

sukanya samruddhi yojana
पुणे : पालिकेनेच बुजविला चक्क नैसर्गिक ओढा!

दास म्हणाल्या, ‘या योजनेची माहिती तसेच पोस्टाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शहरासह ग्रामिण भागात शिबिरांचे आयोजन केले जात आहे. विविध संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून खाती उघडण्यासाठी मदत होत आहे. या सोबतच आधार कार्ड दुरुस्ती, नवीन आधार कार्ड काढणे, ई-श्रम कार्ड काढून देणे या सेवाही शिबिरांमध्ये दिल्या जातात. तसेच कोणताही अतिरिक्त मोबदला मिळत नसतानाही पोस्टमन घराघरांत जाऊन खाती उघडण्यासह पोस्टाच्या सेवा देत आहेत. पोर्णिमा पवार या महिला पोस्टमननी ६०० हून अधिक खाती उघडून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.’

पुणे टपाल विभागाने उघडलेली खाती

४८ हजार - २०२० ते २०२१

एक लाख दोन हजार ७६५ - २०२१ ते १५ फेब्रुवारीपर्यंत

किती मुलींना मिळू शकेल लाभ?

  • कुटुंबातील फक्त दोन मुलींना लाभ मिळू शकेल.

  • जर एखाद्या कुटुंबात दोनहून अधिक मुली असतील तर त्या कुटुंबातील फक्त दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

  • जुळ्या मुली असतील तर त्यांना या योजनेचा लाभ स्वतंत्रपणे मिळेल म्हणजेच त्या कुटुंबातील तीन मुली लाभ घेऊ शकतील.

  • या योजनेंतर्गत १० वर्षांखालील मुलींचे खाते उघडले जाऊ शकते.

  • २५० रुपयांपासून ते दीड लाखापर्यंत गुंतवणूक करता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com