
नैसर्गिक ओढे-नाल्यात उत्खननातील दगड, डबर, माती टाकून ओढा बुजवून पुणे महानगरपालिकाच पर्यावरणाचा -हास करीत आहे.
पुणे : पालिकेनेच बुजविला चक्क नैसर्गिक ओढा!
मुंढवा - केशवनगर गायरान जमिनीत गोठ्यांसाठी नैसर्गिक ओढे-नाल्यात (Natural Odha) उत्खननातील दगड, डबर, माती टाकून ओढा बुजवून (Explained) पुणे महानगरपालिकाच (Pune Municipal) पर्यावरणाचा -हास करीत असल्याने, स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमीमध्ये नाराजीचा सूर उमटल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
केशवनगर हद्दीतील कचरा व जॅकवेल प्रकल्पाजवळील वाहणारा नैसर्गिक ओढा-नाला व ओढ्या- नाल्यातील पाणी, पाण्यातील व काठावरील लहान मोठे जिवंत वृक्ष व त्या वृक्षांवरील पक्ष्यांची घरटी देखील उध्वस्त करून, या जागेवर पालिकेने उत्खननातील मुरूम, दगड, मातीने २५-३० फुट उंच भराव टाकून बुजविला आहे. त्याचा फटका नदी पात्रालगत असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या १३ इमारतींना येणाऱ्या काळात पुराचा धोका संभू शकतो.
हेही वाचा: महाविकास आघाडीने सहा महिन्यापासून विकासकामे थांबविली - चंद्रकांत पाटील
याबाबत पालिकेने घेतलेल्या बैठक इतिवृत्त प्रमाणे आम्ही तात्पुरता ओढा बुजवित असून परत मार्किंग करून ओढ्यात टाकलेला राडा-रोडा भराव परत उचलणार आहे. असे मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे मेंटनन्स सर्वेहर रूपेश आल्हाट म्हणाले.
तर मनपाचे मालमत्ता व्यवस्थापन उपआयुक्त राजेंद्र मुठे यांनी सांगितले कि, नैसर्गिक ओढे-नाले असे तात्पुरते बुजविले जाऊ शकत नाहीत.“याची वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी करण्यात यावी व बुजविण्यात येत असलेला ओढा-नाला यांचे काम तात्काळ थांबविण्यात यावे व टाकण्यात आलेला राडा-रोडा काढून नैसर्गिक ओढा-नाला पुर्वीसारखा नैसर्गिक रित्या वाहता करावा. अन्यथा राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात दाद मागण्यात येईल.”असे शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे पुणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर यांनी सांगितले.
Web Title: Pune Municipal Corporation Has Explained The Natural Odha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..