धक्कादायक : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील एक कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग.... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या गोळीबार मैदान येथे असलेल्या कार्यालयातील एका कर्मचा-याला कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत.

une-news">पुणे) : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा कहर झाला आहे. बोर्ड प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करून कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान बोर्डाच्या गोळीबार येथे असलेल्या कार्यालयातील एका कर्मचा-याला कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत.

Video : कुरकुंभ येथे केमिकल साठ्याला आग; परिसरात धुराचे लोट

 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचा-यास कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे प्रशासनाने सर्व कार्यालयच लॉकडाउन केले आहे. सध्या केवळ मुख्य कार्यकारी अधिका-यांसह काही नगरसेवक कार्यालयात उपस्थित असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. या कर्मचा-याच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाचीच तपासणी करण्यात आली.

 जुन्नर, जेजुरीच्या शिरपेचात मानाचा तुरा

दरम्यान, संबधित कर्मचा-यावर उपचार सुरू आहेत. तसेच संपूर्ण कार्यालयात औषधांची फवारणी करण्यात आली आहे. याबरोबरच संपूर्ण कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना घरून काम करण्याच्या सूचना मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिका-यांची केबिन वगळता इतर सर्व विभाग लॉक करण्यात आले आहेत.
 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

 या कर्मचाऱ्याला अचानक थंडी आणि तापाची लक्षणे दिसू लागल्याने त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. सध्या 170 पॉझिटीव्ह रुग्ण सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात उपचार घेत असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ विद्याधर गायकवाड यांनी सांगितले.

कोरोनाग्रस्त कर्मचा-यावर उपचार सुरू आहेत. तसेच कार्यालयाच्या सर्व विभागात औषध फवारणी करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिलेल्या आहेत.
- अमित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one person affected by corona