एेकलंत का ! 'त्याच्या'मुळे अख्ख्या गावाचा लागलाय जीव टांगणीला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

मुंबईहून गावात दाखल झालेल्या तरुणाने दोन दिवस आजारपणात घरी काढले. त्याच्या 'आजारपणाचा गावात बोभाटा व्हायला लागला आणि त्रस्त झालेला हा तरुण आजारासह पुन्हा मुंबईला निघून गेला. तो गावातून गेला खरा पण कोरोनाच्या धास्तीने अख्ख्या गावाचाच जीव टांगणीला लागला आहे.

une-news">पुणे) :  ताप, खोकला, सर्दी घेऊन मुंबईहून गावात दाखल झालेल्या तरुणाने दोन दिवस आजारपणात घरी काढले. त्याच्या 'आजारपणाचा गावात बोभाटा व्हायला लागला आणि त्रस्त झालेला हा तरुण आजारासह पुन्हा मुंबईला निघून गेला. तो गावातून गेला खरा पण कोरोनाच्या धास्तीने अख्ख्या गावाचाच जीव टांगणीला लागला आहे.

 पुणेकरांनो, मार्केट यार्डाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

कडूसला हा तरुण स्वतःच्या चार चाकी वाहनातून मुंबईहून आला होता. मुंबईला वाहनचालक म्हणून नोकरीला आहे. नजीकच्या काळात त्याच्या मुंबईहून गावाकडे तीन ते चार फेऱ्या झाल्या आहे. त्यात त्याने नुकतीच मुंबईहून अँबुलन्समधून शेजारच्या तालुक्यात मृतदेह वाहून आणला होता, अशी सुद्धा चर्चा आहे. चार दिवसांपूर्वी कडूसला आपल्या स्वतःच्या चारचाकी वाहनातून आला. त्यावेळी त्याला ताप, सर्दी, खोकला होता. कोरोना सदृश्य लक्षणे असल्याने धास्तावलेल्या आजूबाजूच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, पोलीस पाटील व आरोग्य विभागाला कळवले. त्याच्या आजारपणाचा गावात बोभाटा व्हायला लागला.

 जुन्नर, जेजुरीच्या शिरपेचात मानाचा तुरा

तपासणीसाठी कडूस प्राथमिक आरोग्य केंद्रातून चांडोलीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. एक्स रे काढल्यानंतर घरी आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी झाली. त्यावेळी त्याला ताप नव्हता. पुन्हा घरी पाठवले. पण त्याच्या आजाराबाबत गावात उलटसुलट चर्चा काही थांबत नव्हती. साथ सदृश्य आजार असल्याने तपासणीसाठी हलवायला पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थ करीत होते. पण शासकीय यंत्रणा चालढकल करीत होते. अखेर स्थानिकांच्या चर्चेने त्रस्त झालेल्या 'त्याने' आरोग्य केंद्रातून घरी आल्यानंतर स्वतःच्या वाहनासह गाव सोडले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

आजारी असतानाच मुंबईला गेला, अशी चर्चा सध्या गावात रंगली आहे. ग्रामस्थ व विशेषतः आजूबाजूचा तरुण वर्ग धास्तावला आहे. त्याच्यावर गावावरून मुंबईत लक्ष ठेवण्यात येत आहे. दररोज चाळीस उंबऱ्याची तहान भागवणारी त्याच्या घराजवळची कूपनलिका सध्या ओस पडली आहे. त्याने गाव सोडले पण अख्ख्या गावाची धाकधूक मात्र वाढली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one person affected by corona