पुणे : कोळवाडी-कोटमदरा येथील वन क्षेत्रात वनवा पेटविणारा जाळ्यात

पुणे : कोळवाडी-कोटमदरा येथील वन क्षेत्रात वनवा पेटविणारा जाळ्यात
Updated on

घोडेगाव : कोळवाडी-कोटमदरा येथील वन क्षेत्रात वनवा पेटवला म्हणून कोटमदरा (ता.आंबेगाव) येथील दत्तात्रय मुऱ्हाजी कोकणे याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. .

कोळवाडी/कोटमदरामधील वन विभागाच्या हद्दीत ८ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास दत्तात्रय कोकणे याने जंगल पेटवण्याचा उद्देशाने आग लावली. त्यामुळे वन क्षेत्रातील झाडे व छोट्या जीवजंतूंचे मोठे नुकसान झाले. सदर व्यक्तीला आग लावताना वनपाल एस.एस.भुतेकर यांनी रंगेहाथ पकडले. उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी चौकशी करून सदर व्यक्तीवर वन भारतीय अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास वनपाल एस. एस. भुतेकर करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वनवा पेटवल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाडे, छोटे मोठे जीव यांचे नुकसान होते. तसेच वनविभागाने लावलेली झाडे देखील यामध्ये जळून जातात. यासाठी वनवा पेटवणाऱ्यांवर जुन्नर वनविभागाने कडक कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे. यामध्ये वनवे पेटवणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तसेच वनवा पेटल्याबरोबर वनविभागाचे कर्मचारी व स्थानिक वनसंरक्षण समिती तातडीने हा वनवा आटोक्यात आणतात. परंतु वनवा पेटवणारा सापडत नव्हता. भविष्यात कोणी वनवा पेटवताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच असे करताना कोणी आढळल्यास वनविभागाचे कार्यालय अथवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन वनक्षेत्र अधिकारी योगेशे महाजन यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Treasury Officer Suffers Heart Attack In Manchar Doctors Timely Treatment Helps Save His Life After Severe Chest Pain
Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Marathi News Esakal
www.esakal.com