अजित पवारांचा एक फोन आला अन्...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

बारामती : शहर व परिसरात डेंगीच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत असल्याची बाब माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने यंत्रणेला सूचना केल्यानंतर आज डेंगी निर्मूलनाच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी एकाच दिवसात जवळपास 21 रुग्णांना पुणे येथे हलविण्यासाठी सहकार्य केले. मात्र मुसळे यांनी इतक्‍या मोठ्या संख्येने रुग्ण असल्याचे अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पवार यांनी दिल्ली येथूनच संबंधित अधिकाऱ्यांशी या 
बाबत चर्चा केली. 

जयपूरचा मयंक झाला 21व्या वर्षी न्यायाधीश!

बारामतीत जाऊन डेंगी निर्मूलनासाठी आवश्‍यक उपाययोजनेच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्यानंतर आज आरोग्य, नगरपालिका व इतर संबंधित विभाग हलले, उपाययोजनांना प्रारंभ झाला. सुनीलकुमार मुसळे यांना पुण्यात विविध रुग्णालयांना सहकार्य करण्यासाठी बारामतीकरांनी विनंती केली होती, त्यानुसार त्यांनी संबंधित रुग्णालयात सांगून रुग्णांना तातडीने उपचार मिळतील याची व्यवस्थाही केली, मात्र डेंगीच्या रुग्णांची संख्या पाहून त्यांनी ही बाब पवार यांच्या कानावर घातली. त्यानंतर पवार यांनी तातडीने सूत्रे फिरविली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on one phone call of Ajit Pawar Dengue patients get service