
चार जणांनी एका एकवीस वर्षीय तरुणावर धारदार कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना थेऊर (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. २६) संध्याकाळी सातच्या सुमारास घडली.
लोणी काळभोर (पुणे) : हजारो लोकांच्या गर्दीसमोर चार जणांनी एका एकवीस वर्षीय तरुणावर धारदार कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना थेऊर (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. २६) संध्याकाळी सातच्या सुमारास घडली.
भाजपचा कट्टर नेता शिवसेनेत, समीर देसाईंच्या येण्याने गोरेगावात सेना होणार अधिक...
प्रजाकसत्तादिनाच्या सुट्टीनिमित्त थेऊरच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भावीकांनी हा थरार डोळ्यानी पाहिला. चिंतामणीच्या मंदीराजवळील दुकानासमोरील भऱगर्दीत कोयत्याने हानामारी होत असल्याने, दर्शनासाठी आलेल्या भावीकात भितीचे वातावरण पसरले होते.
आकाश मधुकर भंडारी (वय २१, रा. थेऊर, ता. हवेली) हे त्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असुन, या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अक्षय धनंजय सोनवणे, बाबु, मंदार सकट याचा भाऊ व एक अनोळखी अशा चार जनांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकाश व अक्षय या दोघात एक वर्षापुर्वी किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन,
वरील चौघांनी राडा घातल्याचे स्पष्ठ झाले आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश भंडारी याचे थेऊर येथील चिंतामणी मंदीराजवळ मोबाइल विक्रीचे दुकान आहे. एका मुलीच्या प्रेमप्रकरणातून बंटी रणदिवे याला आकाश याने एक वर्षापुर्वी म्हणजे 26 जानेवारीला समज दिली होती. यावरुन वरील चौघात वाद होता.
'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'
दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आकाश व त्याचा मित्र शुभम मोबाईलच्या दुकनात काम करत असताना, अक्षय सोनवणे व बाबु या दोघांनी दुकानात जाऊऩ, आकाशला कोयत्याच्या साह्याने मारहान करण्यासक सुरुवात केली. यावर आकाश याने जिव वाचवण्यासाठी विठ्ठल - रुक्मीणी मंदीराकडे धाव घेतली. यावर वरील चौघांनी हातात कोयता घेऊऩ आकाशचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दी पाहुन चौघेही पळून गेले. त्यानंतर आकाशच्या नातेवाईकांनी आकाश ला लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक सूरज बंडगर करीत आहेत.