
पाटस-दौंड राज्यमार्गावर बिरोबावाडी हद्दीत टॅंकर व दुचाकी यांच्यात धडक होवून झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली.
पाटस : पाटस-दौंड राज्यमार्गावर बिरोबावाडी हद्दीत टॅंकर व दुचाकी यांच्यात धडक होवून झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली.
आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही
दरम्यान, गुरुवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. कावेरा मनोहर देडगे (वय ५५, रा. उस्मानाबाद, ता. परांडा) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मनोहर देडगे (वय ६०) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मनोहर देडगे यांनी पाटस पोलिस चौकीत फिर्याद दिली.
आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देगडे दांपत्य हे सकाळी दुचाकीवरुन पाटसवरुन दौंडकडे जात होते. बिरोबावाडी हद्दीत येताच देडगे यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱया टॅंकरची धडक बसली. काही क्षणातच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या कावेरा रस्त्यावर पडल्या. यावेळी ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मनोहर हे थोडक्यात बचावले मात्र त्यांना दुखापत झाली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
परीसरातील नागरीकांनी व इतर वाहनचालकांनी जखमी मनोहर यांना तत्काळ उपचारासाठी पाठवून दिले. पाटस पोलिस चौकीतील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कावेरा यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान, अपघातानंतर संबधित टॅंकर चालकाने पळ काढला. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टॅंकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
(संपादन : सागर डी. शेलार)