कांदा गडगडला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

कृषी विधेयकांमधील तरतुदींविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी ठाण मांडलेले असतानाच कांद्याच्या दरात पुन्हा तीव्र घसरणीने कृषी विधेयकांमधील फोलपणा उघड झाला आहे. परराज्यातून कांद्याची आवक, कांद्याची आयात आणि निर्यातबंदीच्या रूपाने झालेल्या सरकारी हस्तक्षेपामुळे कांद्याचे भाव पुन्हा गडगडले आहेत.

सोमेश्वरनगर - कृषी विधेयकांमधील तरतुदींविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी ठाण मांडलेले असतानाच कांद्याच्या दरात पुन्हा तीव्र घसरणीने कृषी विधेयकांमधील फोलपणा उघड झाला आहे. परराज्यातून कांद्याची आवक, कांद्याची आयात आणि निर्यातबंदीच्या रूपाने झालेल्या सरकारी हस्तक्षेपामुळे कांद्याचे भाव पुन्हा गडगडले आहेत. आज लोणंद (जि. सातारा) कृषी उत्पन्न बाजार समितीत गरवा कांद्याच्या लिलावात आठवड्यात सतराशे रुपये प्रतिक्विंटलची घट झाल्याचे दिसून आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या कांद्याला सात ते आठ हजार रुपये क्विंटलपर्यंतचा भाव मिळू लागला होता. त्याचवेळी केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यातून एकीकडे कांदा वगळला, पण दुसरीकडे सन १९९२चा विदेशी व्यापार कायद्यान्वये १४ सप्टेंबरला कांद्यावर निर्यातबंदी लादली. तरीही दर घटेनात म्हणून २४ ऑक्टोबरला साठवणुकीवर निर्बंध घालत आयातीची बंधने शिथिल केली. 

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

जीवनावश्यक वस्तू कायद्यातून कांदा वगळताना ‘असाधारण परिस्थितीत सरकार पुन्हा नियंत्रण आणू शकते’ या घातलेल्या छुप्या तरतुदीचा या निर्बंधांसाठी वापर केला गेला. या निर्यातबंदी व निर्बंधांचे परिणाम आता तीव्रतेने जाणवत आहेत. आज लोणंद (ता. खंडाळा) बाजार समितीत झालेल्या लिलावात गरवा कांद्याला १००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल, तर हळवी कांद्याला १००० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. 

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

या तुलनेत २३ नोव्हेंबरला हेच दर १००० ते ५७०० आणि १००० ते ४२००, असे होते. तर, २६ नोव्हेंबरला १००० ते ४८०० आणि १००० ते ४७००, असे होते. यामध्ये उच्च प्रतिच्या कांद्यामध्ये चार दिवसात आठशे, तर आठ दिवसात सतराशे रुपये प्रतिक्विंटलने घट झाल्याचे दिसून आले.

पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार 

गरवाचे प्रतिक्विंटल दर

  • १००० ते ४००० - ५ नोव्हेंबर       
  • १००० ते ५३५० - ९ नोव्हेंबर
  • १००० ते ५४०० - १९ नोव्हेंबर  
  • १००० ते ५७०० - २३ नोव्हेंबर
  • १००० ते ४८०० - २६ नोव्हेंबर      
  • १००० ते ४००० - ३० नोव्हेंबर      

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion Rate Decrease