''हॅलो! मी पेटीएम ऑफिसमधून बोलतोय...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

एका अज्ञात व्यक्तीने महिलेच्या मोबाईलवर कॉल केला.''मी पेटीएमधून बोलत असल्याचे सांगून केवायसीसाठी पेटीएम खात्यावर तुमचे डेबिट कार्ड स्कॅन करा'' असे सांगितले.

पुणे : ''हॅलो, मी पेटीएम ऑफिसमधून बोलतोय... तुमच्या खात्याची केवायसी करायची बाकी आहे. तुम्ही त्यासाठी पेटीएम खात्यावर डेबिट कार्ड स्कॅन करा,'' असे सांगून एका महिलेची 47 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी बालेवाडी येथील एका महिलेने (वय 40) तक्रार दिली आहे. त्यावरून चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने महिलेच्या मोबाईलवर कॉल केला.मी पेटीएमधून बोलत असल्याचे सांगून ''केवायसीसाठी पेटीएम खात्यावर तुमचे डेबिट कार्ड स्कॅन करा''असे सांगितले. त्यावर या महिलेने पेटीएमच्या खात्यावर डेबिट कार्ड स्कॅन केल्यानंतर 70 हजार रुपये खात्यातून गायब झाल्याचे दिसून आले.

पुण्यात सायबर विभागातील पोलिसालाच बनावट कॉल

आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केली. या गुन्ह्याचा तपास महिला पोलिस निरीक्षक माया देवरे करीत आहेत. 

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online cheating by pretending talking from Paytm office in Pune