
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आणि महाविद्यालयांमध्ये ज्या पदव्युत्तर पदवीचे प्रथम वर्षाचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत, अशा अभ्यासक्रमांचे ऑनलाइन वर्ग गुरुवारपासून (ता. २८) सुरू होणार आहेत. प्रथम सत्र मे महिन्यात संपल्यानंतर, जून महिन्यात दुसरे सत्र सुरू होणार आहे. याबाबत विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर केले आहे.
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आणि महाविद्यालयांमध्ये ज्या पदव्युत्तर पदवीचे प्रथम वर्षाचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत, अशा अभ्यासक्रमांचे ऑनलाइन वर्ग गुरुवारपासून (ता. २८) सुरू होणार आहेत. प्रथम सत्र मे महिन्यात संपल्यानंतर, जून महिन्यात दुसरे सत्र सुरू होणार आहे. याबाबत विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर केले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनामुळे अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. तर अंतिम वर्षाच्या परीक्षा वादामुळे लांबणीवर पडल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने व विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेल्या सूचनांनुसार पुणे विद्यापीठासह इतर विद्यापीठांनी ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेतल्या. पुणे विद्यापीठाच्या परीक्षा नोव्हेंबर महिन्यात संपल्या, निकालातील त्रुटी दूर करण्यातही बराचसा कालावधी गेला. दरम्यान, अजून व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू असली, तरी इतर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वेळापत्रक पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे.
'केंद्रातील मंत्र्यांनी भालेरावांच्या कविता ऐकाव्यात'; शिक्षणमंत्र्यांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला!
राज्य शासनाने अद्याप थेट महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे तूर्त प्रथम वर्षाचे वर्ग हे ऑॅनलाइन पद्धतीने होणार आहे. शासनाचे आदेश आल्यानंतर थेट शिक्षण सुरू केले जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट यासह इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू आहे. ती संपल्यानंतर त्याचे प्रथम व द्वितीय सत्राचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
पोलिसाच्या अंगावर गाडी घातली अन् ठोकली धूम; येरवड्यातील प्रकार
या अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू
एमएससी, एमकॉम, एमए, मेंटल मॉरल ॲण्ड सोशल सायन्स, एमए एज्युकेशन, बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड, एमलीब, फाइन आर्ट, एमए जर्नालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशन हे महाविद्यालयांमध्ये शिकवले जाणारे वर्ग सुरू होतील. तर पुणे विद्यापीठात शिकवले जाणारे एमएससी, एमटेक, एमकॉम, एमबीए एक्झीकेटीव्ह, एमबीए (फार्मा बीटी), एमए, मेंटल मॉरल ॲण्ड सोशल सायन्स, एलएलएम, एमए एज्युकेशन, बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड, एमलीब, फाइन आर्ट, एमए जर्नालिझम ॲण्ड मासकम्युनिकेशन आणि एमए योगा अभ्यासक्रम ऑनलाइन सुरू होणार आहेत.
प्रथम सत्र
२८ जानेवारी ते २२ मे
दुसरे सत्र
१५ जून ते १ ऑक्टोबर
Edited By - Prashant Patil